लासलगाव: पीडितेला उपचारासाठी मुंबईच्या मसीना रूग्णालयात हलविले!

लासलगाव: पीडितेला उपचारासाठी मुंबईच्या मसीना रूग्णालयात हलविले!

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकावर प्रेमसंबंधातील वादातून एका 30 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ही महिला 67 टक्के भाजली असून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सदर महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला मुंबईत हलविण्यात आले आहे. पहाटे तीनच्या सुमारास पीडित महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानं डॉक्टरांनी निर्णय घेतला. मुंबईतील भायखळा येथील मसीना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके

निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकावर पीडित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत होती. त्यावेळी अचानक चार अज्ञात तरूणांनी महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवले. या दुर्देवी घटनेमध्ये महिला गंभीर भाजली आहे. सध्या तिला नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नाशिकच्या लासलगावमध्ये बस स्थानकावर महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून पीडितेच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. तसेच पीडितेवर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

लासलगाव येथे शनिवारी दोघांनी पीडितेवर पेट्रोल टाकून पेटवले. त्यात गंभीररीत्या भाजलेल्या पीडितेस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आहे. दरम्यान, नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडितीची चौकशी केली. त्याचप्रमाणे हा हल्ला दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच बाटलीमध्ये पेट्रोल देणाऱ्या पंप चालनकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या आधीच्या घटनांमध्ये आरोपींनी ज्या पंपावरून पेट्रोल घेतले त्या पंप चालकांवर देखील कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या पीडित महिलेला 3 अपत्ये आहेत. महिलेच्या पहिल्या पतीचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर रामेश्वर मधुकर भागवत याचेशी दोन महिन्यापूर्वीच निमगाव वाकडा येथील रेणुका माता मंदिरात विवाह केला होता. त्यानंतर संशयित आरोपी रामेश्वर पुन्हा दुसरं लग्न करण्याच्या तयारीत असल्याचं समजल्यानं गेल्या दोन-तीन दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगितलं जातं आहे. प्राथमिक माहितीनुसार, या महिलेला पेटवून दिल्याचं सांगितलं जात असलं तरी आपसातील वादातून तिने स्वत:च बाटलीत आणलेल्या पेट्रोलनं स्वत:ला पेटवून घेतल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नेमकं तिला पेटवलं गेलं की तिने स्वत:च पेटवून घेतलं, या बद्दल तपास करणाऱ्या पोलिसांनाही शंका आहे. यात कसून तपास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

First Published on: February 16, 2020 8:44 AM
Exit mobile version