पशुधन शिबिरामुळे मिळणार ७ हजार जनावरांना मदत

पशुधन शिबिरामुळे मिळणार ७ हजार जनावरांना मदत

पशुधन शिबिर (सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)

राज्यात दुष्काळ जाहीर केला असून येत्या उन्हाळ्यात याची झळ अनेक ठिकाणांना बसणार आहे. दुष्काळात पाणी टंचाई हा एक मोठा प्रश्न आहे. माणसाला पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासते अशा मध्ये गुरांना कसे सांभाळायचे? असा प्रश्न ग्रामिण विभागात पडला आहे, मात्र सातारा येथील माण तालूक्यात जनावरांसाठी पशुधन शिबिराचे आयोजन जानेवारी महिन्यातच करण्यात आले आहे. या शिबिरात जनावरांना चारा, पाणी आणि निवारा देण्यात येणार आहे. याचा फायदा येथील ७ हजार जनावरांना होणार असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या दुष्काळाची झळ येथील १४०० कुटुंबांना बसणार आहे.

११२ तालूक्यांमध्ये दुष्काळ घोषित

२०१८ वर्षाच्या शेवटी महाराष्ट्र सरकारने ११२ तालूक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला होता. दुष्काळापासून वाचण्यासाठी अनेक ग्रामस्थांनी पाण्याचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. माण देशी फाऊंडेशनतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चेतना गाला सिन्हा या संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. जनावरांना पाणी टंचाई पासून वाचवण्यासाठी हे शिबिर जानेवारी महिन्यात सुरु करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दुष्काळामुळे या गावातील काही नागिराकांनी स्थलांतराचा पर्याय निवडला आहे.

First Published on: January 21, 2019 9:29 AM
Exit mobile version