मद्याच्या नशेत तरुणाची आत्महत्या

मद्याच्या नशेत तरुणाची आत्महत्या

मयत तरुण

समाजात सुखी संसाराचे स्वप्न प्रत्येक कुटुंब पहात असते मात्र याच सुखी संसाराला व्यसनाचे ग्रहण लागले की मग सारं काही संपले. अशा घटना आपण चित्रपटातून नेहेमी पाहात असतो. मात्र शिरुन तालूक्यातील कवठे यागावात हा प्रकार प्रत्यक्ष बघायला मिळाला. दारूच्या नशेत स्वतःच्या पोटावर वार करून घेऊन आपल्या सुखी संसारातुन शेवटचा निरोप एका तरुणाने घेतला आहे. योगेश अशोक लाळगे वय ३४ असे मयत तरुणाचे नाव आहे. शिरुर तालुक्यातील कवठे यमाई गावात मयत योगेश पत्नी वर्षा ६ वर्षाची मुलगी यांच्या सोबत रहात होता. योगेशला काम धंदा मिळत नसल्याने योगश व्यसनाच्या आहारी गेला होता. गावातील नागरिक,नातेवाईक मित्रांनी योगेशला व्यसनापासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

कशी घडली घटना….

श्री येमाई मंदिर चौकात भाड्याचा खोलीत वास्तव्यास असणारे योगेश अशोक लाळगे याने दारूच्या नशेत काल रात्रीच्या सुमारास स्वतःच्या पोटावर चाकूने वार केले होते. चाकू मारल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला ही माहिती दिली. जखमा किरकोळ स्वरूपाच्या वाटल्याने वर्षा यांनी घरातील कापसाने त्या जखमा पुसून घेतल्या. दारूच्या नशेत योगेश चाकूने मारहाण करील या भीतीने वर्षा ह्या रात्रीच रावडेवाडी येथील मामाकडे गेल्या होत्या. आज सकाळी साडेआठला घरी आल्यानंतर घरात पती योगेश हे निपचित पडलेले त्यांना दिसून आला. योगेशचा मृत्यु झाला होता त्याबाबत पत्नी वर्षाने शिरूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी योगेशचा अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामीण भागातील सुखी संसार दारु मुळे उद्धवस्त होत चालले असताना कवठे यमाई परिसरात जोमात अवैध दारु विक्री होत असुन हे कधी थांबणार असाच प्रश्न विचारला जातोय.
First Published on: December 15, 2018 2:32 PM
Exit mobile version