‘लग्न कर नाहीतर गोळ्या घालेन’, एकतर्फी प्रेमातून त्याने केला गोळीबार!

‘लग्न कर नाहीतर गोळ्या घालेन’, एकतर्फी प्रेमातून त्याने केला गोळीबार!

दिवसेंदिवस एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या विकृत घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहे. नुकतीच हिंगणघाट, मुंबईमधील घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणानं तरुणीसमोरच गोळीबार केला. या घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी ही घटना कॅमेरात कैद केली, त्यामुळे पोलिसांनी केवळ ४ तासात अक्षयला अटक केली आहे. जुन्नर तालुक्यातील जांबुत फाटा परिसरात रविवारी ही घटना घडली आहे.

अक्षय दंडवते असं तरुणीवर दबाव टाकणाऱ्या तरुणाचं नाव आहे. अक्षय तरुणीवर एकतर्फी प्रेम करतो. त्यानं लग्नासाठी तरुणीवर दबाव टाकण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, तरुणीनं त्याला सातत्यानं नकार दिला. तरुणीच्या नकारामुळे अक्षयला राग आला. रागाच्या भरात अक्षयने तरूणीच्या पायाजवळ गोळीबार केला. अक्षयनं गोळीबार केला तेव्हा काही नागरिक घटनास्थळी होते. त्यांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर नारायणगाव पोलिसांनी चार तासांत अक्षय दंडवेतला अटक केली.

नुकतीच हिंगणघाटमध्येही एकतर्फी प्रेमात असाच काहीसा प्रकार घडला होता. हिंगणघाटमध्ये महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या पीडितेवर आरोपी विकेश नगराळेने पेट्रोल टाकून तीला मारण्याचा प्रयत्न केला. यात पीडीती ४० टक्केहून अधिक भाजली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता.


हे ही वाचा- हिंगणघाट प्रकरण : आरोपी विकी नगराळे याचा आत्महत्येचा प्रयत्न


 

First Published on: March 2, 2020 9:19 AM
Exit mobile version