भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर आणि धाडसी राण्या

भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर आणि धाडसी राण्या

चंदा मांडवकर :

भारताचा इतिहासात पाहिल्यास राजा, महाराजा आणि त्यांच्या राण्या-महाराण्यांचे राजघराणे, त्यांचा थाट पाहून सर्वजण त्याच्या मोहात पडतात. अशातच काही राण्या-महाराण्यांनी आपल्या सौंदर्यासह धाडसीपणामुळे इतिहासात नाव कोरले आहे. त्यांनी चतुराईने काही परिस्थितींमध्ये धाडसी निर्णय ही घेतले. परंतु या राण्यांच्या कारणास्तव काही वेळेस भयंकर नरसंहार ही झाले होते. या धाडसी आणि सुंदर राण्या फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ही प्रसिद्ध होत्या.

– महाराणी गायत्री देवी

इतिहासातील सर्वाधिक सुंदर महिलांमधील महाराणी गायत्री देवी यांचे नाव येते. भारतात महिलांची स्थिती अधिक बळकट करण्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान होते. त्या एका शाही परिवारातील होत्या. लग्नानंतर त्यांनी परिवाराच नव्हे तर आपल्या राज्याला ही सांभाळले. गायत्री देवी या जयपुरच्या महाराणी होत्या.

महाराणी गायत्री देवी यांचा जन्म खरंतर लंडनमध्ये झाला होता. त्यांचा विवाह जयपुरचे महाराजा सवाई मानसिंह दवितीय यांच्यासोबत झाला होता. त्या महाराजा मानसिंह यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. आपले उत्तम व्यक्तीमत्व आणि सौंदर्यासाठी त्या ओळखल्या जायच्या. असे बोलले जायचे की, त्यांना मेकअप करण्याची ही कधीच गरज भासायची नाही. प्रसिद्ध फॅशन मॅगझिन ‘वोग’ (Vogue) ने त्यांना जगातील सर्वाधिक सुंदर १० महिलांमध्ये मानले होते. तर जुलै २००९ मध्ये वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

– राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म वाराणसीतील एका मराठी ब्राम्हण परिवारात झाला होता. त्यांचे नाव मणिकर्णिका असे ठेवण्यात आले होते. झांसीचे राजा गंगाधर राव यांच्या सोबत विवाह झाल्यानंतर त्यांचे नाव बदलले गेले. खरंतर इतिसाहात त्यांचे नाव त्यांच्या वीरतेसाठी कोरले गेले. मात्र त्या हुशार, चतुर असण्यासह सुंदर ही होत्य. १८५७ मध्ये गदर मध्ये त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढाई ही केली होती. आपल्या तान्ह्या मुलाला पाठीवर बांधून त्या अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिल्या. आज इतिहासात त्यांना ‘झाशीची राणी’ या नावाने ओळखले जाते.

-राणी पद्मिनी

राणी पद्मिनी, चित्तोडचा राजा रतन सिंह यांच्या पत्नी होत्या. राणी पद्मिनी अत्यंत सुदंर दिसायच्या. त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा ऐकून दिल्लीतील शासक अल्लाउद्दीन खिलजी याने चित्तोडवर आक्रमण ही केले होते. या युद्धात जवळजवळ ३० हजार सैनिक ठार झाले. परंतु युद्धात अल्लाउद्दीन खिलजी याचा विजय होऊन ही त्याला राणी पद्मिनी यांच्यापर्यंत पोहचता आले नाही. कारण त्यांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी हजारो राजपूत स्रियांसह अग्नित उडी घेत आयुष्य संपवले होते.

– नूरजहाँ

बादशाह अकबर याची मुलगी नूरजहाँ अत्यंत सुंदर दिसायची. तिच्यामध्ये सौंदर्यासह आणखी काही असे गुण होते की, सर्वजणांच्या नजरा तिच्यावर होत्या. वयाच्या १७ व्या वर्षात तिचा विवाह अलीकुली नावाच्या एका धाडसी ईराणी सोबत झाला होता. मात्र १६०७ मध्ये जहांगीरच्या दूतांनी नूरजहाँच्या पतीला ठार केले. त्यानंतर नूरजहाँला जहांगीरच्या हरमध्ये ठेवले गेले. १६११ मध्ये जहांगीरने नूरजहाँ सोबत लग्न केले. अशातच ती सम्राट जहांगीरची २१ वी पत्नी झाली आणि नंतर १६१३ मध्ये तिला बादशाह बेगम बनवले गेले.

-रजिया सुल्तान

रजिया सुल्तान दिल्लीतील सल्तनतवर राज करणारी पहिली महिला सुल्तान होत्या. त्या इत्लुतमिश यांच्या पुत्री होत्या. रजिया सुल्तान अत्यंत सुंदर दिसायच्या. रजिया सुल्तान या पर्दा प्रथेच्या विरुद्ध पुरुषाप्रमाणे वस्र परिधान करायच्या. इल्तुतमिशने आपल्या उत्तराधिकारीच्या रुपात रजिया सुल्तान यांना निवडले गेले होते. रजिया सुत्लान यांनी १२३६ ते १२४० पर्यंत दिल्लीच्या सल्तनवर शासन केले. त्यांच्या शासनाच्या अवघ्या काही दिवसातच त्या शक्तिशाली शासक बनल्या होत्या.

-मद्रासच्या महाराणी सीता देवी

सीता देवी, बडौदा घराण्यातील महाराणी होत्या. त्यांचा जन्म मद्रा मध्ये झाला होता. त्या आपल्या सौंदर्य, फॅशन आणि शाही अंदाजासाठी ओळखल्या जायच्या. त्यांच्या स्टाइल आणि सौंदर्यासाठी त्यांना ‘इंडियन वालिस सिम्सन’ असे म्हटले जायचे. त्यांचा विवाह बडौदा घराण्यातील प्रिंन्स प्रताप सिंग गायकवाड यांच्यासोबत झाला होता.


हेही वाचा :

पूर्वीच्या काळी राण्या-महाराण्या सुंदर दिसण्यासाठी नक्की काय करायच्या?

First Published on: January 12, 2023 3:28 PM
Exit mobile version