Monday, December 2, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीBeautyलग्नासाठी ब्रायडल ब्युटीकेअर टिप्स

लग्नासाठी ब्रायडल ब्युटीकेअर टिप्स

Subscribe

लग्नाची तारीख जवळ येताच, प्रत्येक वधू आपल्या त्वचेच्या काळजीच्या दिनचर्येकडे अधिक लक्ष देते. प्रत्येक प्रसंगी आपली त्वचा चमकदार दिसावी अशी वधूची इच्छा असते. यासाठी वधूने प्री-ब्रायडल स्किन केअर रुटीन नक्कीच फॉलो करायला हवे. प्री- ब्रायडल स्किन केअर रुटीनमुळे तुमची त्वचा निरोगी बनते. या रुटीनमुळे सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. बॉडी पॉलिश करण्यापासून ते विविध मास्क आणि पॅक वापरल्याने तुमची त्वचा लग्नासाठी एकदम परफेक्ट तयार होते. तुमच्या स्किन केअर रुटीनमुळे तुमच्या त्वचेला पोषण मिळते आणि लग्नासाठी तुमची चमकदार आणि मऊ त्वचा बनते.

CTM महत्वाचे –
त्वचेची काळजी घेणे, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करणे हे निरोगी त्वचेसाठी अत्यंत गरजेचे असते. CTM दिनचर्या अर्थात क्लीजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग केवळ तुमची त्वचा स्वच्छ आणि मॉइश्चरायझ ठेवत नाही तर त्वचेवरील स्ट्रेसही कमी करते आणि डाग पडण्यापासून रोखते.

- Advertisement -

एक्सफॉलिएशन गरजेचे –
त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी एक्सफॉलिएशन गरजेचे असते. यामुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. परिणामी, त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय त्वचेचा रंगही सुधारतो. यासाठी तुम्ही घरी तयार केलेले स्क्रबही वापरू शकता. कॉफी आणि साखरेचे स्क्रब यासाठी उत्तम. चेहऱ्याला एक्सफॉलिएट करताना हलक्या हातांनी मसाज अवश्य करा.

फेस मास्क वापरा –
घरगुती वस्तूंच्या वापराने फेस मास्क बनविण्याचा प्रयन्त करा. फेस मास्क नक्कीच तुमच्या स्किन केअर रुटीनचा एक भाग असायला हवा. फेस मास्क तुमच्या त्वचेला खोलवर स्वच्छ, एक्सफॉलिएट आणि पोषण करण्यास फायद्याचे ठरते. ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.

- Advertisement -

फेशिअल सिरम –
त्वचा चमकदार बनविण्यासाठी फेशिअल सिरम अत्यंत उपयुक्त असते. मात्र, हे वापरताना त्वचेच्या प्रकारानुसार फेशिअल सिरम वापरा. फेशिअल सिरम वापरताना मुरूम कमी करण्यास, जळजळ टाळण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करणारे घटक असलेलेच सिरम वापरा.

नखांची काळजी घ्या –
चेहऱ्यासोबत हातांची काळजी घेणे गरजेचे असते. तुमच्या हातांची नखे सौंदर्यात भर पाडत असतात. यासाठी वधूने नखे स्वच्छ ठेवायला हवीत. लग्न पूर्वी मॅनिक्युअर करून घेणे आवश्यक आहे. नखांना हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल किंवा खोबरेल तेलाने मालिश करायला हवी.

सूर्यप्रकाशापासून त्वचेचे रक्षण करा –
उन्हाळ्यातील लग्न असो की, हिवाळ्यातील लग्न SPF हे महत्वाचे असते. तीव्र सूर्यप्रकाशापासून वधूने लग्नापूर्वी त्वचेचे संरक्षण करणे आवश्यक असते. यासाठी तुम्ही बाहेर निघण्यापूर्वी त्वचेच्या प्रकारानुसार सनस्कीन लावायला हवे.

हेअर स्पा –
वधूने त्वचेसोबत केसांचीही योग्य निगा राखायला हवी. स्ट्रेस आणि प्रदूषणामुळे केस निर्जीव आणि कोरडे दिसू लागतात. अशा परिस्थितीत तुम्हाला हेअर स्पा करणे फायद्याचे ठरू शकते.

निरोगी आहार –
ब्युटी केअर टिप्स फॉलो करण्याव्यतिरिक्त तुम्ही निरोगी आहारही घ्यायला हवा. यासाठी लग्नाच्या ६ महिने आधी तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही डाईट देखील फॉलो करू शकता.

 

 


हेही वाचा : किचनमधल्या ‘या’ 5 पदार्थात दडलंय ब्युटी सिक्रेट

 

- Advertisment -

Manini