Sunday, May 5, 2024
घरमानिनीBeautyकिचनमधल्या 'या' 5 पदार्थात दडलंय ब्युटी सिक्रेट

किचनमधल्या ‘या’ 5 पदार्थात दडलंय ब्युटी सिक्रेट

Subscribe

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आपण अनेकदा पार्लरमध्ये जाऊन अनेक पैसे खर्च करतो. परंतु हा ग्लो थोडे दिवसचं टिकतो. पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी स्वयंपाक घरातील काही वस्तूंच्या मदतीने चेहऱ्या ग्लो आणू शकता. त्या वस्तूंचे लेप तयार करून त्याचा उपयोग फेस पॅक म्हणून करू शकता.

घरगुती वस्तूंपासून तयार करा फेस पॅक

Ottawa Centretown Spa | Healthy and Beautiful Skin and Nails

- Advertisement -

 

  • दही

एक चमचा बेसनाच्या पिठात दोन चमचे दही, दोन थेंब मध यांचे मिश्रण तयार करून अर्धा तास तसेच राहू द्या. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

- Advertisement -
  • पुदिना

हिरवा पुदिना वाटून अर्धा तास चेहर्‍यावर लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. पुदिन्याचा लेप लावल्याने त्वचेची उष्णता हळुहळू कमी होते आणि पिंपल्सचे डागदेखील कमी होतात.

  • मसूर डाळ

एक छोटी वाटी मसूर डाळ रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्यातील पाणी काढून ते वाटून घ्या. त्यात थोडे कच्चे दूध आणि बदाम पावडर टाकून लेप तयार करा आणि तो चेहर्‍यावर लावल्याने त्वचेमधील कोरडेपणा दूर होतो.

  • उडीद डाळ

उडीद डाळीची पावडर तयार करून त्यात गुलाबपाणी, ग्लिसरीन आणि बदाम पावडर मिसळा. हा तयार झालेला लेप लावल्याने चेहरा चमकदार आणि सुरकुत्या नाहीशा होतात.

  • काकडी

काकडी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात थोडे दूध टाकून तयार झालेला लेप चेहरा आणि मानेवर लावा. काही वेळ तसाच ठेवून धुवून टाका. त्याने चेहर्‍यावरील कोरडेपणा दूर होऊन त्वचा मुलायम होते.

 


हेही वाचा : स्वस्तात मस्त… घरच्या घरी करा नॅचरल फेशियल

- Advertisment -

Manini