ग्लिसरीन कसे वापरायचे?

ग्लिसरीन कसे वापरायचे?
थंडीच्या दिवसात त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वारंवार लावले जाते. मात्र ते फार काळ आपला परिणाम दाखवू शकत नाही. अशावेळी त्वचेला मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी ग्लिसरीनचा वापर त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि ओलावा लॉक करण्यासाठी उपयुक्त ठरतो. यासोबतच त्वचेची संबंधित समस्याही दूर होतात. तसेच हे गंधहीन आणि रंगहीन सिरप चेहरा आणि ओठांचा रुक्षपणा, कोरडेपणा दूर करण्यासाठी मदत करते. जाणून घेऊयात ग्लिसरीनचे फायदे आणि त्याची त्वचेवर लावण्याची योग्य पद्धत,
ग्लिसरीनचे फायदे –
1) अँटी एजिंग एजंट
वय वाढत गेल्यावर त्वचेवर दिसणाऱ्या बारीक रेषा दूर करण्यासाठी ग्लिसरीनचा वापर खूप प्रभावी ठरला आहे. तसेच ते त्वचा घट्ट करण्यास मदत करते. यासोबतच त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्यापासून देखील आराम मिळतो.

2) ओठ मऊ ठेवण्यास मदत होते
हिवाळ्यात कोरड्या ओठांच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी ग्लिसरीन नियमितपणे ओठांवर लावणे फायद्याचे ठरते. तसेच ओठ काळे होण्याच्या समस्येपासून सुटका होते.
3) ब्लॅक अँड व्हाईट हेड्सची समस्या दूर होईल
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स ग्लिसरीनच्या मदतीने काढले जाऊ शकतात. यासाठी ग्लिसरीनमध्ये समान प्रमाणात मध मिसळा आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर तयार झालेले ब्लॅक हेड्स सहज बाहेर येतील.
4) टॅनिंग काढा 
तुम्ही सनस्क्रीन म्हणून ग्लिसरीनचा वापर करून त्वचेचे सहज संरक्षण करू शकता. तसेच यामध्ये आढळणारे लॅक्टिक ॲसिड आणि ग्लायकोलिक ॲसिड त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतात.
ग्लिसरीन कसे वापराल –
1) ग्लिसरीनसह टोनर बनवा 
ग्लिसरीन वापरल्यामुळे त्वचेवरील खुली छिद्र घट्ट होण्यास मदत मिळेल. यासाठी तुम्ही एक भांड्यात अर्ध चमचा ग्लिसरीन घ्या आणि त्यात २ चमचे गुलाबपाणी टाका. हे मिश्रण कॉटन बॉलच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा याने त्वचेची लवचिकता टिकून राहील.
2) मेकअप रिमूव्हर 
त्वचेच्या स्वच्छतेसाठी चेहऱ्यावर ग्लिसरीन लावा आणि चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. याच्या मदतीने त्वचेच्या थरांमध्ये असलेला मेकअप वितळवून सहज काढता येतो. त्यासाठी हातावर ग्लिसरीन घ्या, त्यात पाण्याचे काही थेंब मिसळा, चेहऱ्यावर लावा आणि मेकअप काढा.
3) क्लिन्झर 
तुमच्या चेहऱ्यावर विविध प्रकारचे केमिकल क्लिन्झर वापरण्याऐवजी ग्लिसरीन वापरल्याने त्वचा निरोगी राहते. चेहऱ्यावर लावण्यासाठी 3 चमचे दुधात 1 चमचे ग्लिसरीन घालून मिक्स करा. आता ते चेहऱ्यावर लावा. रात्रभर चेहऱ्यावर राहू द्या आणि सकाळी चेहरा धुवा. याच्या मदतीने चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल आणि धूळ सहज काढता येईल.

 


हेही वाचा; Beauty : हिवाळ्यात करा चंदन तेलाने मालिश

First Published on: December 27, 2023 12:17 PM
Exit mobile version