Wednesday, May 8, 2024
घरमानिनीBeautyब्युटी प्रोडक्ट्स असे ठेवा क्लीन आणि सेफ

ब्युटी प्रोडक्ट्स असे ठेवा क्लीन आणि सेफ

Subscribe

मेकअप हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असते. महिला कुठेही गेल्या तरी त्या त्याच्या मेकअपच्या वस्तू कधीच विसरत नाहीत. ऑफिसला जाणे असो किंवा एखाद्या समारंभाला, प्रत्येक स्त्री मेकअपची पूर्ण काळजी घेत असते. चांगल्या दर्जाची मेकअप प्रोडक्टस इतके महाग असतात की त्यांची योग्य देखभाल न राखल्यास ते लवकर खराब होऊ शकतात. तुम्ही चुकून एखाद खराब मेकअप प्रोडक्ट वापरल्यास, त्याच्या तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. यासाठी ब्युटी प्रोडक्ट्स क्लीन आणि सेफ ठेवणे गरजेचे असते.

फेस पावडर – फेस पावडरची योग्य देखभाल न केल्यास तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचू शकते. फेस पावडर क्लीन करण्यासाठी तुम्ही कापसाच्या बॉलवर सॅनिटायझर फवारावून फेस पावडरची पॅलेट साफ करू शकता.

- Advertisement -

लिक्विड फाऊंडेशन – लिक्विड फाउंडेशन साफ करण्यासाठी कॉटन बॉलवर अल्कोहोल किंवा सॅनिटायझर शिंपडून फाऊंडेशनची बाटली आणि त्याची नोझल पूर्णपणे स्वच्छ करू शकता.

लिपस्टिक – लिपस्टिकची शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी लिपस्टिक लावून झाल्यानंतर स्वच्छ बोटाने लिपस्टिकचे टोक स्वच्छ करणे गरजेचे असते आणि नंतरच तिचे झाकण लावावे. लिपस्टिक कायम थंड हवामान किंवा रूम टेम्परेचर असणाऱ्या खोलीतच ठेवावी.

- Advertisement -

मेकअप ब्रश – मेकअप ब्रशची स्वछता राखणे अत्यंत महत्वाचे असते. ब्रश स्वच्छ करण्यसाठी, ब्रश एका ग्लास भिजवा. काही वेळाने ते बाहेर काढा, आता हलक्या हाताने ब्रश चोळा. स्वच्छ पाण्याने धुवून पूर्णपणे कोरडे झाल्याशिवाय ते पॅक करून ठेऊ नका.

आयशॅडो किंवा आयलायनर – इन्फेक्शन होऊ नये यासाठी आयशॅडो किंवा आयलायनर कोणासोबत शेअर करू नये. दीर्घकाळ टिकण्यासाठी आयशॅडो किंवा आयलायनरच वापर करताना जास्त काळ ते खुल्या हवेत ठेऊ नयेत.

फेस क्रीम आणि लोशन – अनेक फेस क्रीम आणि लोशनमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि इ असते. त्यामुळे या वस्तू जास्त काळ खुल्या हवेत ठेऊ नयेत नाहीतर, ते खराब होऊ शकतात. शिवाय फेस क्रीम आणि लोशनचे झाकण टाइटच बंद करायला हवे.

 

 

 

 


हेही वाचा : Oxidised Jewellery : ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी टिकून राहावी यासाठी टिप्स

 

- Advertisment -

Manini