Thursday, April 18, 2024
घरमानिनीBeautyएक्सपायरी डेट झालेले ब्युटी प्रॉडक्ट्स 'असे' करा रियूज

एक्सपायरी डेट झालेले ब्युटी प्रॉडक्ट्स ‘असे’ करा रियूज

Subscribe

मेकअप करायला कोणाला आवडत नाही. अशी क्वचितच मुलगी सापडेल जिच्या बॅगेत मेकअप प्रोडक्टस सापडत नाही. सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी प्रत्यके मुलगी मेकअप प्रोड्क्टसची मदत घेते. पण,आपले आवडते ब्युटी प्रोडक्ट्स एक्सपायरी डेट झाल्यावर फेकून देण्यास अनेक महिलांच्या जीवावर येते. इतके महागडे प्रोडक्टस विकत घ्यायचे आणि ते फेकून द्यायचे. हे काम प्रत्येक महिलेसाठी कठीण असते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही एक्सपायरी डेट झालेले ब्युटी प्रॉडक्ट्स रियूज करू शकाल. अशाने ते फेकून न देता त्यांच्या योग्य प्रकारे वापर होईल.

- Advertisement -

आयशॅडो – प्रत्येक मुलीकडे विविध रंगाच्या आयशॅडो असतात. आयशॅडो पॅलेटमधील सगळेच रंग वापरले जात नाहीत आणि कालांतराने आयशॅडोची एक्सपायरी डेट संपून जाते. अशावेळी तुम्ही ते फेकून देण्याऐवजी तिला रियुज करू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला विविध रंगाच्या आयशॅडो वेगवेगळ्या बॉटलमध्ये भरायच्या आहेत. नंतर त्यात थोडे थिनर टाकून रंगाचे लिक्विड बनवून घ्यायचे आहे. अशाने तुमच्याकडे विविध रंगाच्या नेलपेंट्स तयार होतील.

स्किन टोनर – एक्सपायरी डेट झालेले स्किन टोनर फेकून देण्याऐवजी तुम्ही घरचे आरसे किंवा मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप स्क्रीन, कारच्या काचा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. अशाने तुमच्या महागड्या स्किन टोनरचा पुनर्वापर होईल.

- Advertisement -

लिपबाम – थंडीच्या दिवसात सर्रासपणे लिपबामचा वापर केला जातो. मात्र, जसजसा उन्हाळ्याचे दिवस येऊ लागतात तसे लिपबामचा वापर कमी केला जातो. अशावेळी अनेकदा लिपबामची एक्सपायरी डेट होऊन जाते. अशा परिस्थितीत, तुम्ही ते फेकून देण्याऐवजी, शूज चमकविण्यासाठी किंवा पँटची खराब झालेली झिप दुरुस्त करण्यासाठी लिपबाम वापरू शकता.

परफ्युम – एक्स्पायर डेट झालेले महागडे परफ्यूम्स, डिओड्रेंड्स फेकून देण्यास जीवावर येतात. अशा परिस्थितीत तुम्ही ते फेकून देण्याऐवजी, रूम फ्रेशनर किंवा टॉयलेट फ्रेशनर म्हणून वापरू शकता. असे केल्याने तुमच्या आवडीचा सुगंध कायम तुमच्या आसपास दरवळत राहील.

मेकअप ब्रश – दररोज मेकअप ब्रश वापरल्याने अनेकदा कालांतराने ब्रश कडक होतात. अशा वेळी तुम्ही ते फेकून देण्याऐवजी ते संगणकाच्या कीबोर्ड साफ करण्यासाठी वापरू शकता.

 

 


हेही वाचा : Dry Flowers : वापरलेल्या फुलांपासून असे बनवा सुगंधित धूप

- Advertisment -

Manini