Tuesday, May 21, 2024
घरमानिनीRecipeKitchen Tips : महिलांसाठी खास टिप्स

Kitchen Tips : महिलांसाठी खास टिप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच पदार्थ रुचकर होण्यासाठी गृहिणींचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो आणि पदार्थ देखील रुचकर होण्यास मदत होते.

8 Ways to Cook Faster, Healthier Meals | SELF

- Advertisement -
  • तूर डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरुन घातल्यास आमटीला छान आणि वेगळी चव येते.
  • पुलाव करताना तांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि 2 शिट्ट्या कराव्यात यामुळे भात मोकळा होतो.
  • कोणत्याही पदार्थात पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब्ज करुन घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्ज 10-15 मिनिटे ठेवा. मग एका चाळणीत 5 मिनिटे पनीर नितळत ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डीशमध्ये वापरण्यासाटी तयार.
  • गुळाच्या पोळ्या करताना पोळ्या खूप जाड किंवा फार पातळ नसाव्यात फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते. जर आतील सारण कडेपर्यंत जात असेल तर कातण्याने पोळीच्या कडा कापून घ्याव्यात.
  • 3-4 दिवस लिंबू ताजे रहाण्यासाठी त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवा. वापरते वेळी फ्रिजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यात घालून मग चिरा.

13 Interesting Kitchen Hacks and Tips

  • पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो.
  • पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात.
  • तळणीचे मोदक मंद आचेवरच तळावे. मोठ्या आचेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून तळलेले वाटतात पण आतून कच्चे राहतात आणि लगेच मऊ पडतात.
  • पोहे तळायला खोलगट बारीक जाळी असलेला झारा घेतल्यास त्यात पोहे घालून नुसता गरम तुपात बुडवून पोहे तळावेत.ज्यामुळे पोहे बाहेर पडून जास्त वेळ तळल्याने जळणार नाहीत.
  • आदल्या दिवशीच्या उरलेल्या वरण-भातात गव्हाचे, डाळीचे पीठ, तिखट, मीठ, हळद जिरेपूड, चिरलेला कांदा, लसूण घालून केलेले थालीपीठ चवीला खूपच छान लागते.

हेही वाचा : Kitchen Tips : स्वयंपाक घरातील खास टिप्स

- Advertisment -

Manini