शॅम्पू करण्याआधी आणि नंतर केसांची अशी घ्या काळजी

शॅम्पू करण्याआधी आणि नंतर केसांची अशी घ्या काळजी

सुंदर केस प्रत्येक स्त्रीला हवे असतात. यासाठी ती सर्वोतोपरी काळजी घेत असते. मात्र, तरीही अनेक स्त्रियांना केसांच्या अनेक समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी तुमच्या काही चुका या गोष्टीसाठी कारणीभूत असू शकतात. यातील पहिले म्हणजे शॅम्पूच्या आधी आणि नंतर केसांची योग्यरीत्या काळजी न घेणे.

शॅम्पू करण्यापूर्वी करा या स्टेप्स –

केस धुण्यापूर्वी केसांवर ब्रश फिरवा – शॉवर करण्याआधी मऊ क्रिस्टल ब्रशने केसांमधील गुंता सोडवून घ्या. असे केल्याने केस तुटणार नाहीत आणि शॅम्पू देखील केस व्यवस्थित साफ करेल.

केसांना तेल लावा – शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावल्यास केसांना मॉइस्चरायझर्स आणि पोषण मिळण्यास मदत होते, ज्यामुळे केस मऊ आणि अधिक व्यवस्थित राहतात. नारळ, ऑलिव्ह आणि अर्गन तेल केसांना लावण्यासाठी अगदी उत्तम असते. स्काल्पमध्ये आणि केसांच्या लांबीमध्ये केसांना मालिश करा.

योग्य शॅम्पूची निवड – योग्य शॅम्पूची निवड केल्याने केस निरोगी राहतात. वेगवेगळ्या केसांच्या प्रकारांना मॉइश्चरायझिंग, वोल्युमयझिंग शँम्पूसारख्या वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनची आवश्यकत असते. त्यामुळे शॅम्पू निवडताना एक्सपर्टचा सल्ला तुम्ही घेऊ शकता.

योग्य प्रमाणात शॅम्पूचा वापर – जेव्हा शँम्पू विचार केला जातो तेव्हा तो आपण योग्य प्रमाणात वापरायला हवा. केस धुताना स्कॅल्पवर अधिक लक्ष केंद्रित करा. बहुतेक तेल आणि घाण स्कॅल्पवर जमा होते आणि त्यामुळे स्कॅल्पवर गोलाकार हालचालींमध्ये हळुवारपणे मालिश करा.

थंड पाण्याने केस धुवा – केसांचे क्युटिक्सल बंद करण्यासाठी, मॉइश्चरायझेशन राखण्यासाठी आणि चमकण्यासाठी केस नेहमी थंड पाण्याने धुवावेत. असे केल्याने केसगळती थांबते.

धुतल्यानंतर केसांची काळजी घेण्याच्या स्टेप्स –

जुन्या कॉटन टी – शर्टचा वापर करून केस सुकवा – केस धुतल्यानंतर टॉवेलने जोरात चोळणे टाळा, कारण अशाने केस खराब होतात आणि गळू लागतात. त्यावेजी, मऊ आणि शोषक टॉवेलने केस हळुवारपणे कोरडे करा.

हेअर सिरम किंवा लिव्ह इन कंडिशनर वापरा – लिव्ह इन कंडिशनर वापरल्याने मॉइश्चरायझेशन राखण्यास मदत होते. केसांच्या टोकाकडे लक्ष देऊन थोड्या प्रमाणात शॅम्पू केसाना समप्रमाणात लावा. स्टायलिंग टूल्स वापरताना केसांना उष्णतेच्या नुकसानापासून वाचविण्यास देखील मदत करू शकते.

 

 

 


हेही वाचा : त्वचा निरोगी ठेवण्यासाठी लावा मँगो फेसपॅक

 

First Published on: March 21, 2024 6:03 PM
Exit mobile version