हवामान बदलले की चेहऱ्यावर अनेक बदल दिसतात. अशावेळी कधी मुरुमांची समस्या तर कधी त्वचेतला चिकटपणा जाणवतो. या सर्व समस्या टाळण्यासाठी आणि त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्यासाठी उन्हाळ्यातील हंगामी फळापासून फेस मास्क तयार करून त्वचेला हायड्रेट ठेवता येते. जेणेकरून त्वचेवर ग्लो येईल आणि त्वचाही खराब होणार नाही.
त्वचा निरोगी राहण्यासाठी टिप्स
आंबा आणि दही मास्क
लॅक्टिक अॅसिडने भरपूर असलेले दही आपली त्वचा मऊ ठेवते. यातील एन्झाइम्स त्वचेला नरम ठेवतात. यामुळे त्वचेवरील कोरडेपणाची समस्या टाळता येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-बी त्वचेसाठी लोशनचे काम करते. त्याचबरोबर आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन-सी त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढवते. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला हायड्रेट ठेवते.
असा लावा फेस मास्क
- एका भांड्यात 2 चमचे आंब्याचा पल्प मॅश करा. आता त्यात दही आणि एक चमचा मध मिसळा.
- या तीन गोष्टी मिक्स करून चेहऱ्याला लावा.
- हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर पाण्याने चेहरा धुवा.
- या फेस मास्कमुळे चेहऱ्याची त्वचा उन्हापासून सुरक्षित राहते आणि त्वचेची लवचिकता टिकून राहते.
- त्यामुळे त्वचेवरील डागही दूर होतात.
- हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा चेहऱ्यावर लावू शकता.
- यामध्ये असलेल्या घटकांच्या मदतीने त्वचेला टॅनिंगची समस्या देखील टाळता येते.
हेही वाचा :