Divorce मनपसंद जोडीदार निवडूनही लव्ह मॅरेजवाल्यांचे डिवोर्स वाढताहेत? काय आहे कारण

Divorce मनपसंद जोडीदार निवडूनही लव्ह मॅरेजवाल्यांचे डिवोर्स वाढताहेत? काय आहे कारण

गेल्या काही वर्षांपासून समाजाची विचारसरणीच वेगाने बदलली असून अरेंज मॅरेज पेक्षा लव्ह मॅरेजकडे लोकांचा कल वाढतोय. अॅरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेजमध्ये हवा तसा जोडीदार निवडता येत असल्याने तरुण पीढीची लव्ह मॅरेजलाच अधिक पसंती आहे. लव्ह मॅरेजचा हा ट्रेंड आहे. यामागे प्रामुख्याने जोडप्याची अशी मानसिकता असते की मनाप्रमाणे जोडीदार निवडल्याने पुढे वैवाहीक जीवनात काही प्रॉब्लेम होणार नाहीत. पण गेल्या काही वर्षांपासून लव्ह मॅरेजवाल्यांचाच डिवोर्स घेण्याचा आकडा वाढू लागला आहे. यामागे नक्की काय कारणे आहेत ते बघूया.

परिवाराची साथ नाही

लव्ह मॅरेज करणाऱ्या व्यक्ती या प्रामुख्याने स्वतंत्र विचारांच्या असतात. आपल्या आवडी निवडींवर त्यांना पुरेपूर विश्वास असतो. त्यातून मग घरातल्यांचा विचार न घेता बऱ्याचवेळा मुलं आईवडिलांना गृहीत धरूनच लग्न करतात. यामुळे अशा कपल्सच्या वादात आई वडिलं भूमिका घेणं टाळतात. तू केलंय, तर तूच भोग अशी यामागची आई वडीलांची भावना असते. यामुळे दोघेही जोडीदार एकटे पडतात.

घाईत लग्नाचा निर्णय

लग्नाचा निर्णय हा कधीही घाईगडबडीत घेऊ नये. कारण जोडीदाराची मानसिकता, विचार पूर्णपणे जाणून घेतल्यानंतर विवाह केला जातो. पण लव्ह मॅरेजमध्ये व्यकती प्रेमाच्या नशेत इतका झिंगलेला असतो की त्याला फक्त लग्न करायचे असते. आपल्यात झालेले प्रेम हे खरे प्रेम आहे की आकर्षण हे देखील त्यांना समजत नाही. आपल्या जोडीदाराचे कुटुंबाबददल काय विचार आहेत याबददल विचार केला जात नाही. परिणामी नवलाईचे नऊ दिवस संपले की दोघांमध्ये कुरुबुरी सुरु होतात. पुढे वादात रुपांतर होते.नात्यातील प्रेम संपते.

जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा

लव्ह मॅरेजमध्ये कपल्सला सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असतात. पण जेव्हा खऱ्या परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येते तेव्हा समोरचा पार्टनर दुसऱ्याकडून भरमसाठ अपेक्षा करतो. त्यामुळे देखील लव्ह मॅरेजमध्ये नाती तुटू लागली आहेत.

 

First Published on: April 26, 2023 7:56 PM
Exit mobile version