उन्हाळ्यात टोमॅटो फ्रेश ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

उन्हाळ्यात टोमॅटो फ्रेश ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

संग्रहित छायाचित्र

मराठीत या फळाला टोमॅटो, भेदरे किंवा बेलवांगे म्हणतात. ब्रिटीशकाळात टोमॅटोला ‘तांबेटे’ असेही म्हटले जात. संस्कृतमध्ये याला हिण्डीरः, रक्तमाचे व रक्तवृत्नाक असे शब्द वापरले जातात. टोमॅटोत भरपूर मात्रा मध्ये कैल्शियम, फास्फोरस व विटामिन सी असते. टोमॅटो कॅनिंग, वाळवून, गोठवून किंवा पिकलिंगद्वारे संरक्षित केले जाऊ शकतात. ते जाम, जेली आणि मुरंबा यांसारखे फळ स्प्रेड तयार करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात. कच्चे टोमॅटो किंवा कच्च्या टोमॅटोचे पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये (४० अंश फॅरेनहाइटच्या खाली) ठेवता येतात, परंतु कालांतराने ते बॅक्टेरिया, यीस्ट आणि मोल्डमुळे खराब होतात.

 

अनेकांच्या आहारातील सर्वात आवडीचा पदार्थ हा टोमॅटो मानला जातो. स्वयंपाकघरातील अनेक भाज्यांमध्ये किंवा अन्नपदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. याशिवाय सलाड आणि पास्ता-पिझ्झा सारख्या पदार्थांमध्येही टोमॅटोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी घरातील वापरासाठी टोमॅटो दीर्घकाळ ताजे ठेवावे लागतात. अनेकजण हे पालेभाज्या किंवा टोमॅटोला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी त्याला फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवतात. त्यातही ते अनेकदा खराब होतात. ताजे टोमॅटोसुद्धा उन्हाळ्यात काही दिवसातच खराब होऊ लागतात. फ्रीजमध्ये ठेवल्याने जास्त काळ ताजे राहत नाही.. टोमॅटो विकत घेण्याची आणि साठवण्याची योग्य पद्धत माहित असेल तर खराब न होता ते जास्त काळ ताजे राहतील, चला जाणून घेऊया.

 

अशी घ्या काळजी

बाजारातून टोमॅटो खरेदी करत असताना ताजे आणि काहीसे लाल टोमॅटो खरेदी करायला हवे. कारण ते जास्त काळ टिकतात आणि खराबही होत नाहीत. जास्त पिकलेले किंवा पातळ टोमॅटो विकत घेऊ नये, कारण त्याला किड लागलेली असण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या हंगामात फक्त देशी टोमॅटो खरेदी करण्याचा प्रयत्न करा, ते जास्त काळ खराब होत नाहीत. टोमॅटो नेहमी त्याच्या पानांसह खरेदी करा, टोमॅटो पाने जोडलेले असले तरीही ते ताजे राहतात. जर तुम्ही टोमॅटोला फ्रीजमध्ये साठवून ठेवत असाल तर त्याला कागदाच्या पिशवीत, प्लास्टिकच्या पिशवीत किंवा बॉक्समध्ये ठेवायला हवं. कारण त्यामुळं टोमॅटोची चव आणि पोत दोन्ही योग्य राहण्यास मदत होते. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी स्वछ धुवून  घ्या. टोमॅटो फ्रीजच्या खालच्या भागात ठेवण्याचा प्रयत्न करा. फ्रीजमध्ये टोमॅटो एका वर एक ठेवू नका, अन्यथा ते खराब होऊ शकतात.

हेही वाचा – Immunity वाढण्यासाठी घ्या ‘हा’ चहा 

First Published on: June 10, 2023 1:56 PM
Exit mobile version