Wednesday, May 8, 2024
घरमानिनीFashionNavaratri 2023 : लेहेंग्यावर घाला 'अशा' प्रकारचे फॅन्सी शर्ट्स

Navaratri 2023 : लेहेंग्यावर घाला ‘अशा’ प्रकारचे फॅन्सी शर्ट्स

Subscribe

आजकाल फॅशन म्हंटल की सगळेजणच उत्सुक असतात. तसेच फॅशन करताना हल्ली कशावर पण काहीपण घातले तरी ते छानच वाटतं. ट्रेंडी आऊटफिट्स आणि आपण करू ती फॅशन हल्ली चालते. तसेच लेहेंग्यावर आता ब्लॉउज किंवा त्या पॅटर्न नुसार वरचे आऊटफिट घालतात असे नाही. तर आजकालच्या ट्रेंडनुसार लेहेंग्यावर लॉन्ग आणि लूज शर्ट्स घातले जातात. हे शर्ट आपण इन करून घालू शकतो किंवा क्रॉप शर्ट्स सुद्धा यावर शोभून दिसत.

Trending lehenga with shirt designs - Indo western lehenga with shirt ideas  to try wedding season - YouTube

- Advertisement -

1. फ्लोरल प्रिंट शर्ट्स

जर का तुम्हाला लेहेंग्यावर काय घालायचे सुचत नाही अशावेळी तुम्ही लेहेंग्यामधल्या कोणत्याही रंगाची निवड करून मॅचिंग शर्ट्स त्यावर घालू शकता. या शर्ट्समध्ये तुम्हाला प्लॅन शर्ट्स,प्रिंटेड शर्ट्स किंवा फक्त फ्लोरल प्लॅन देखील तुम्ही घालू शकता.

2. सिल्क प्लॅन शर्ट्स

सिल्क किंवा कॉटन शर्ट्स तुम्हाला लेहेंग्यावर घालायचे असेल तर काँट्रास शर्ट्स यावर तुम्ही घालू शकता. तसेच सिल्क शर्ट्स हे लेहेंग्यावर जास्त उठून दिसतात. जर का तुम्हाला इंडो वेस्टर्न लूक करायचा असेल तर सिल्क शर्टच्या खाली तुम्ही ट्रेडिशनल लेहेंग्यावर घालू शकता. या शर्ट्समध्ये तुम्हाला आवडीनुसार शर्ट्सचे कलर मिळतील. तसेच हव्या त्या प्रिंटमध्ये किंवा डिझाइन्समध्ये हे शर्ट्स तुम्ही घालू शकता.

- Advertisement -

3. नेकलाईन शर्ट्स

लेहेंग्यावर स्टायलिश दिसायचे असेल तर तुम्ही नेकलाईन शर्ट्स नक्की ट्राय करायला हवे. तसेच हे शर्ट्स तुम्हाला एक आकर्षक लूक देतो. ज्यामुळे तुमचा लेहेंगा तुमच्या शर्ट्समूळे जास्त उठून दिसतो. तसेच नेकलाईन शर्ट्समध्ये खूप प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. यासोबतच आता लेहेंगा आणि नेकलाईन शर्ट्स हे आजकाल ट्रेंडी फॅशनचा एक भाग बनले आहे. या शर्ट वर तुम्ही हव्या त्या प्रकारच्या ज्वेलरी घालू शकता. ज्या तुमच्या नेकलाईन शर्टला हटके लूक देईल.

4. हेवी एम्ब्रॉयडरी शर्ट्स

सणासुदीला जेव्हा तुम्ही लेहेंगा घालता तेव्हा तेव्हा तो हेवी पॅटर्नमध्ये असतो. अशावेळी प्लॅन शर्ट्स यावर सूट होणार नाही. तर यावर हेवी एम्ब्रॉयडरी शर्ट्स जास्त उठून दिसतील. यामध्ये तुम्हाला साडीच्या कपड्यामध्ये असलेले डिझायनर शर्ट्स घालू शकता. तसेच जर का तुमच्या लेहेंग्यावर एम्ब्रॉयडरी असेल तर तुम्ही यावर काँट्रास एम्ब्रॉयडरी शर्ट्स घालू शकता. एम्ब्रॉयडरी शर्ट्स घालताना हा शर्ट ३/४ साईजमध्ये असेल तर जास्त चांगला वाटेल.

5. हेवी लेहेंगा विथ प्लॅन शर्ट्स

आजकाल लेहेंगा घालताना त्यावर हेवी टॉप घालत नाहीत तर सिम्पल प्लॅन शर्ट्स घालतात. तसेच हे शर्ट्स तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मिळतील. यामध्ये तुम्हाला हवे ते रंग सुद्धा मिळतील. ट्रेंडी फॅशनला सूट होईल असे प्लॅन शर्ट्स या हेवी लेहेंग्यावर जास्त चांगले दिसतील.


हेही वाचा : Navaratri 2023 : नवरात्री स्पेशलसाठी फॅन्सी लाँग skirts

- Advertisment -

Manini