Thursday, April 18, 2024
घरमानिनीFashionलग्नात नेसायचीये स्टायलिश साडी, मग फॉलो करा या आयडियाज

लग्नात नेसायचीये स्टायलिश साडी, मग फॉलो करा या आयडियाज

Subscribe

तुम्हीही लग्नाची तयारी करताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी. अनेक वधूंना लग्नात कोणत्या साड्या घालायच्या हा प्रश्न पडतो. लग्नात हटके लूक करायचा असतो स्टायलिश सुद्धा दिसायचे असते. पण तुम्ही बारकाईने विचार केलात तर बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींचे साडी लूक तुम्ही तुमच्या लग्नात परिधान करू शकता.

देवदास मधील ऐश्वर्या आणि माधुरीची साडी –
संजय लीला भन्साळीच्या देवदास चित्रपटाला कोणाला माहित नाही. बहुतेक करून सर्वानी तो पाहिलंच असेल. या चित्रपटात ‘डोला रे डोला’मध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित पारंपारिक बंगाली पांढऱ्या आणि लाल साडीत दिसल्या होत्या. पारंपारिक दागिन्यांसह तिचा लुक आणखी वाढला होता. या चित्रपटाचा फॅशनप्रेमी आणि चित्रपट रसिकांवर इतका प्रभाव पडला की आजही त्याची चर्चा होते. हा चित्रपट लूक नववधू करू शकता.

- Advertisement -

बाजीराव मस्तानीमधील दीपिका आणि प्रियांका –

Bajirao Mastani: Watch Deepika Padukone and Priyanka Chopra revisit Devdas in Pinga - India Today
अंजु मोदी यांनी डिझाइन केलेल्या दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्राच्या या साड्या या महिलांना वेड लावणाऱ्या ठरल्यात. पेशवेकालीन स्त्रियांची वेषभूषेसोबत हा लूक तुम्ही लग्नात डिझाइन करू शकता. ह्याने तुम्हाला पारंपरिक लूक मिळण्यास मदत मिळेल. ह्यातील गडद गुलाबी आणि मरून टोन हे पारंपारिक रंग आहेत ज्यात तुम्ही खुलून दिसाल.

- Advertisement -

टू स्टेट्समधील आलीयाचा लूक –
या चित्रपटातील कथा ही एका तामिळ मुलीच्या पंजाबी मुलाशी लग्न करण्याभोवती फिरते. ह्या चित्रपटात आलियाचा लूक प्रेक्षकांना इतका आवडला की, अनेकांनी चित्र पाहिल्यानंतर हा लूक लग्नात केला होता. तुमच्यासाठी हा ऑप्शन सुद्धा बेस्ट आहे. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यांमध्ये, तिने चमकदार लाल आणि सोन्याची कांजीवरम साडी परिधान केली आहे, ही दक्षिण भारतीय नववधूंसाठी एक क्लासिक साडी आहे.

रझिया मधील आलिया –
तुम्हाला लग्नात लाल रंगापेक्षा काहीतरी वेगळे निवडायचे असेल तर राझी चित्रपटातील आलियाचा लूक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या साडीसोबत आलियाने डोक्यावर घातलेला पेस्टल दुपट्टावर सुंदर सोनेरी नक्षीदार बॉर्डर होती. सोबत तिने एक नाजूक नेकलेस आणि गोल्ड मून इअररिंगसह घातले होते. जर तुम्हाला लग्नात साधा लूक करायचा असले तर हा पर्याय उत्तम आहे.

 


हेही वाचा ;

- Advertisment -

Manini