Friday, February 23, 2024
घरमानिनीFashionमहिलांनी हिवाळ्यात 'अशी' करा कार्डिगन स्वेटर स्टाईल

महिलांनी हिवाळ्यात ‘अशी’ करा कार्डिगन स्वेटर स्टाईल

Subscribe

हिवाळ्याच्या हंगामात कार्डिगनची फॅशन पुन्हा एकदा ट्रेंड होतआहे. अभिनेत्री आलिया भट्ट, कुशा कपिला आणि रश्मिका मंदान्ना यांच्या स्टायलिश कार्डिगन पोशाखांनंतर, आता कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींपासून ते ऑफिसमध्ये जाणाऱ्या मुलींपर्यंत आणि घरगुती महिलांना कार्डिगन घालणे आवडते. अशातच आज आपण पाच नवीन डिझाइनर कार्डिगन्सचे कलेक्शन घेऊन आलो आहोत.

हे कपडे उबदार फॅब्रिकपासून बनविलेले कार्डिगन्स स्वेटर आहेत. जे स्त्रियांच्या अनेक फॅशनला पर्यायी आहेत. तसेच कार्डिगन या कपड्याचा लूक इतका परिपूर्ण आहे की तुम्ही या लूकला ट्रेडिशनल किंवा मॉर्डन पद्धतीने कोणत्याही प्रकारे स्टाईल करू शकता.

- Advertisement -

Best Cardigans For Women 2023

कार्डिगन्स या ड्रेसचा प्रकार मॉर्डन आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही डिझाइनमध्ये येतात. हॉट आणि फंकी लूकसाठी तुम्ही आधुनिक डिझाइनचे कार्डिगन कॅरी करू शकता. याउलट, जर तुम्हाला साडी किंवा सूटवर लोकरीचा स्वेटर घालायचा असेल तर तुम्ही ट्रेडिशनल डिझाइनचे वूमन्स कार्डिगन्स कॅरी करू शकता. तसेच यामध्ये तुम्हाला स्लीव्हज आणि नेकलाइन डिझाइनमध्ये विविध प्रकार बघायला मिळतील. यासोबतच तुम्हाला फॅब्रिकचा कोणत्याही पर्याय हवा असेल तर हे देखील यामध्ये उपलब्ध होईल.

- Advertisement -

1. कार्डिगन स्वेटर

कार्डिगन हे कोणत्याही रंगाचे तुम्हाला मिळू शकतात. तसेच या खाली काँट्रास रंगाची कोणतीही पॅन्ट यावर मॅच होईल. कार्डिगनमध्ये तुम्हाला 6 रंगांचे कोणतेही रंग येथे मिळतील. याची नेकलाइन V आकाराची असते. तसेच या कपड्याचे फॅब्रिक हे अॅक्रेलिक पासून बनवलेले असल्याने ते शरीराला पूर्ण उष्णता देतात. विशेष म्हणजे या कार्डिगन स्वेटरचा आकार हा बऱ्यापैकी सगळ्यांना व्यस्थित होणारे असते.

2. मिक्स फायबर कार्डिगन स्वेटर

मिक्स फायबर कार्डिगन स्वेटरमध्ये खूप कमी रंग उपलब्ध असतात. या कार्डिगन स्वेटरचे लोकर हे मिश्रित फॅब्रिकचे बनलेले असल्याने,हिवाळ्यात महिलांसाठी हे परफेक्ट स्वेटर आहे. या प्रकारचे कार्डिगन स्वेटर हे जीन्स आणि स्कर्ट यांसारख्या सर्व प्रकारच्या या कॅज्युअल आऊटफिटमध्ये मॅच होण्यासारखे आहे.

3. काँट्रास कलर कार्डिगन स्वेटर

हे फॅन्सी डिझायनर कार्डिगन स्वेटर तुम्ही पार्टी किंवा आउटिंगमध्ये सुद्धा घालू शकतात. तसेच यामध्ये अनेक रंगीत रंग आहेत जे तुम्ही सहज कोणत्याही जीन्सवर घालू शकता. महिलांसाठी हे कार्डिगन स्वेटर अगदी परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होतात. हे वूल ब्लेंड फॅब्रिकपासून बनवलेले स्वेटर तुम्ही हिवाळ्यात आरामात घालू शकता. यासोबतच तुम्हाला कोणाला भेटवस्तू द्यायची असेल तर अशा प्रकारचे कार्डिगन स्वेटर तुम्ही भेट म्हणून देऊ शकता.

4. अरबी कापडाचे कार्डिगन स्वेटर

अरबी कापड हे अतिशय उबदार असते. तसेच यापासून बनवलेले कपडे हे दिसायला देखील सुंदर दिसतात. या प्रकारचे स्वेटर साध्या डिझाइनमध्ये स्टायलिश लुक देतात. तसेच पार्टी किंवा लग्नाच्या सीझनमध्ये तुम्ही हे कार्डिगन घालू शकता. यामुळे तुम्हाला एक झक्कास लूक मिळेल. विशेष म्हणजे या अरबी कार्डिगन स्वेटरवर तुम्ही बॉटम जीन्स घालू शकता. ज्यामुळे तुमचा एकूणच लूक स्टायलिश दिसेल.

________________________________________________________________________

हेही वाचा : जुन्या मिडी ड्रेसचा ट्रेंड…

- Advertisment -

Manini