Fashion Tips : ‘या’ 6 बॅग्स प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्यात

Fashion Tips : ‘या’ 6 बॅग्स प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्यात

हल्ली फॅन्सी बॅग्सचे ट्रँड खूप चर्चेत आहेत. वेगवेगळ्या कलरचे शॉपिंग बॅग्स आपल्याला खूप वापरायला आवडतात. अशातच या बॅग्स मध्ये खूप व्हरायटी देखील आहेत. बॅग्स अशी एक अशी वस्तू आहे ज्यामध्ये आपण आपल्या गरजेच्या सर्व गोष्टी आपल्याजवळ ठेवू शकतो. जर आपण ऑफिसमध्ये किंवा कोणत्या पार्टीमध्ये किंवा शॉपिंगमध्ये असलो तर प्रत्येक ठिकाणानुसार आपल्या गरजा बदलतात. तर अशा वेळी वेगवेगळ्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स ह्या आपल्याला लागतात.

जर आपण फॅशनबद्दल बोललो तर बॅग एक महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच बॅग्स आपली गरज पूर्ण करते तसेच एक क्लासी लूक आपल्याला देते. चला तर मग आपण अशाच काही वेगवेगळ्या बॅग्जबद्दल जाणून घेऊया ज्या प्रत्येक स्त्रीकडे असायला हव्यात.

1) चिक टोट बॅग-
ही बॅग त्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांना प्रवास करताना त्यांच्या सर्व आवश्यक गोष्टी एकाच ठिकाणी ठेवायला आवडतात. तसेच या बॅगचा वापर फक्त प्रवासाच्या वेळेपुरता मर्यादित नाही. ही बॅग खरेदी दरम्यान देखील वापरली जाऊ शकते.

2) स्लिंग बॅग-
महत्वाच्या गोष्टी कॅरी करण्यासाठी स्टाइलिश आणि आरामदायक, स्लिंग बॅग आजकाल फेमस आहेत. तसेच लंच किंवा डिनरसाठी बाहेर जाताना ही बॅग तुमच्या सर्व ड्रेसवर सूट होऊ शकते.

3) क्लच बॅग –
क्लच ही एक बॅग आहे जी ऑफिस किंवा व्यावसायिक महिलांमध्ये लोकप्रिय आहे. ही बॅग सहसा हातात धरली जाते किंवा आपण ती आपल्या मोठ्या बॅगमध्ये देखील ठेवू शकता. क्लचचे बॅगचे बरेच प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या कपड्यांवर हि बॅग घेऊ शकतो.

4) वीकेंडर बॅग-
वीकेंडर बॅग्ज त्या सर्व महिलांसाठी योग्य आहेत ज्यांना वीकेंडला जायला आवडते आणि ज्यांना प्रत्येक लहान वस्तू सोबत ठेवायची असते. या बॅगमध्ये लहान सर्व गोष्टींसाठी पुरेशी जागा असते.

5) हँडबॅग्ज-
जर तुम्ही नोकरी करणार्‍या व्यावसायिक महिला असाल आणि ऑफिसच्या ड्रेसअपमध्ये तुम्हाला सर्वोत्तम दिसायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या बॅग घेऊ शकता. तसेच यामध्ये तुम्ही तुमचा लॅपटॉपही त्यात ठेवू शकता आणि ते आरामदायीही आहे. या बॅगची खास गोष्ट म्हणजे हे फॉर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांना सूट करते.


हेही वाचा :  fashion Tips : तुम्ही खूप बारीक आहात का ? तर वापरा या स्टाइलचे टी-शर्ट

First Published on: May 25, 2023 11:42 AM
Exit mobile version