फिटनेस साठी weight loss बरोबर हवी positivity body

फिटनेस साठी weight loss बरोबर हवी positivity body

सगळेजण तंदुरुस्तीसाठी आणि निरोगी शरीरासाठी खूप प्रयन्त करतात. अशातच निरोगी मन असणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने कमी केलेले वजन मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि त्वचा आरोग्य या तिन्हींसाठी हानिकारक आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की फिटनेस हा नेहमीच शरीराच्या सकारात्मकतेशी जोडलेला असतो.

फिटनेस करताना बॉडी ही स्वतःहून मनाने ऍक्टिव्ह झाली पाहिजे. फक्त व्यायाम करून बॉडी टोन होत नाही. याचबरोबर तंदुरुस्तीसाठी फक्त वजन कमी करणे पुरेसे नाही तर शरीराच्या सकारात्मकतेला चालना देणे देखील आवश्यक आहे. तसेच ज्या महिलांना असे वाटते कि आपण जिम करूनच फिट दिसायला हवे तर तसे नाही.

आजकाल चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आणि स्टेज अभिनेत्री अंशुला कपूर इंस्टाग्रामवर अनेक फोटो टाकत असते. तसेच एका फोटोमध्ये अंशुला स्विमिंग कॉस्च्युममध्ये असून ती खूप जाडी दिसत आहे. तिच्या शरीराचा आकार पूर्णपणे फिटनेसच्या बेसवर बसत नाही. पण ती म्हणते मी एकदम स्वस्थ आहे. आणि फिटही आहे. ती आणखी काही किलो वजन कमी करण्यासाठी प्रयन्त देखील करतेय. अंशुलाप्रमाणेच भारती सिंगचेही शरीर लठ्ठ आहे, मात्र ती निरोगी आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की थोडे चरबी असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही रोगी आहात. तर फिटनेस शरीराच्या सकारात्मकतेशी संबंधित आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराचा सकारात्मक विचार करत असाल तर याचा अर्थ तुम्ही फिट आहात.

स्पर्धेसाठी फिटनेस करू नका तर हेल्थी राहण्यासाठी फिटनेस करा-

फिट राहण्यासाठी जास्त वर्कआऊट करू नका. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर किंवा एकूणचं बॉडीवर त्याचा प्रभाव दिसून येईल. फिट राहण्यासाठी योग्यपद्धीने जर वर्कआऊट केले तरच शरीर चांगले राहते. अन्यथा खूप मेहनत करून जर व्यायाम केला तर कधी कधी बॉडी उतरलेलली दिसते. काही लोकांचे असे म्हणणे आहे कि फिट दिसले कि आपण चॅन तंदरुस्त आहोत तर तसेच नाही. फिट राहण्यासाठी योग्य मनाची पॉसिटीव्ह तयारी करणे अत्यंत गरजेचं आहे.


हेही वाचा :  पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हा’ उपाय नक्की करून पाहा

First Published on: June 5, 2023 11:40 AM
Exit mobile version