जास्वदांचे फुल आहे आरोग्यासाठी फायदेशीर

जास्वदांचे फुल आहे आरोग्यासाठी फायदेशीर

बहुतेक जणांच्या बाल्कनीत किंवा गावी अंगणात जास्वंदीचे झाड दिसतेच दिसते. जास्वंदाचे फुल जितके सुंदर आहे तितकेच ते आरोग्यदायी सुद्धा आहे. महिलांच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास जास्वंदीचे फुल अनेक समस्यांवर रामबाण औषंधापेक्षा कमी नाही. यात व्हिटॅमिन सी, मिनरल्स, आयर्न, फायबर आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. जर तुम्ही पिरीएड्सच्या वेदनांनी त्रस्त असाल किंवा त्वचेच्या संबंधित तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर जास्वदींचे फूल तुमच्यासाठी प्रभावी ठरते.

अनियमित पिरीएड्सपासून आराम – जर तुमचे पिरीएड्स अनियमित असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला जास्वदींचे फुल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला जास्वदींचे पाने चहासाठी वापरावी लागतील. खरं तर महिलांच्या शरीरात असलेल्या इस्ट्रोजेन हार्मोन्सची लेवल बिघडणे हे अनियमित पिरीएड्सची कारण ठरते. जर तुम्ही काही दिवस सतत जास्वंदीच्या पानांचा चहा प्यायलात तर तुमच्या पिरियड्सच्या संबधीत सर्व समस्या दूर होऊ शकतात.

पिरीएड्सच्या वेदना कमी होतील – पिरीएड्सदरम्यान पोट दुखणे, क्रॅम्प येणे सामान्य आहे. पण या वेदना जर असह्य झाल्या तर रोजचे रुटीन नकोसे होते. जर तुम्ही सुद्धा अशा समस्येतून जात असाल तर जास्वदींचा चहा समस्येवर रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी जास्वदींच्या फुलातील बिया काढून दोन पाकळ्या सेवन कराव्या लागतील. असे तुम्हाला सलग 1 आठवडा सेवन केल्यानंतर दुखण्यामध्ये बराच फरक जाणवेल.

तोंडातील अल्सरवर फायदेशीर – तोंडाच्या अल्सरने त्रस्त असाल तर जास्वंद उपयुक्त ठरते. तोंडातील अल्सरमुळे जेवण खाणे पिणे कठीण होते. अशावेळी तुम्हाला जास्वंदाची पाने तोंडात चघळायची आहेत. यासाठी रोज सकाळी 4 ते 5 जास्वंदाची पाने नीट चावून खावीत, अशाने तोंडाच्या अल्सरपासून लवकर सुटका मिळते.

केसांसाठी फायदेशीर – केसगळती थांबविण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी जास्वदांचे तेल तुम्हाला मदत करेल. केस छानदार होण्यासाठी या तेलामध्ये तुम्ही दही मिक्स करून देखील लावू शकता. याशिवाय दुसरा पर्याय म्हणजे जास्वदांची फुले वाळवून त्याची पावडर तयार करा. ही पावडर तेलामध्ये मिक्स करून तेल गरम करून केसांची हलक्या हातानी मालिश करा. केसांच्या अनेक समस्या याने दूर होतील.

त्वचेसाठी फायदेशीर – जास्वदांच्या फुलांचा वापर अनेक प्रकारची कॉस्मेटिक प्रोडक्ट टायर करण्यासाठी केला जातो. चेहरा चमकदार करण्यासाठी आणि स्किनसाठी तुम्ही याचे सेवन करू शकता. जास्वंदात अनेक अँटी- ऑक्सीडेंट आणि मॉईशचरायझिंग गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

 

 


हेही पहा : काकडीच्या सालीचा अशा प्रकारे करा वापर

First Published on: April 3, 2024 3:57 PM
Exit mobile version