दिवसातून किती वेळा हात धुवावे

दिवसातून किती वेळा हात धुवावे

जेवण्यापूर्वी किंवा एखादा पदार्थ खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत असे आपल्याला नेहमीच सांगितले जाते. परंतु धावपळीच्या आयुष्यात आपण जेवणापूर्वी हात धुतलेयत की नाही हे सुद्धा लक्षात राहत नाही. एका बाजूला ऑफिसमध्ये आपली बोट कंप्युटरवर चालत असतात त्याच हाताने आपण स्नॅक ही खातो. तेव्हा आपल्याला माहिती नसते की, आपल्या नकळत आपण हानिकारक बॅक्टेरियाचा शरिरात प्रवेश करतात.

हात धुतल्याने बॅक्टेरियाचे संक्रमण होत नाही. ताप आणि फूड पॉइजनिंग पासून तुम्ही दूर राहू शकता. परंतु तुम्हाला विचारले तर दिवसभरात किती वेळा हात धुवावेत तर कोणीही बोलेल की, जेवणापूर्वी हात धुतले तरीही पुरेसे आहे. परंतु प्रत्येक दिवशी कमीत कमी ८-१० वेळा हात धुतले पाहिजेत. जेवल्यानंतर आणि वॉशरुम वरुन आल्यानंतर हात धुतले पाहिजेत.

हात धुण्यासाठी पुर्वीची लोक माती आणि राखेचा वापर करायचे. त्यानंतर साबण आणि लिक्विड साबणाचा ट्रेंन्ड सुरु झाला. आता सॅनिटायझर आणि टिश्यू हँन्डवॉश वापरले जाते. खरंतर २०-३० सेकंदांपर्यंत हात धुवणे पुरेसे आहे. यामुळे हातावरील किटाणू दूर होतात. जर्नल ऑफ फूड प्रोटेक्शनमध्ये छापून आलेल्या रिपोर्ट्नुसार, जर १० सेकंदासाठी गरम पाण्यात हात ठेवले तरीही हातावरील बॅक्टेरिया निघून जातात.

परंतु जर तुम्ही लिक्विड हँन्डवॉशचा वापर करत असाल तर ते पूर्णपणे सुरक्षित नाही. याच्या वापरामुळे हात थोडे ओलसर राहतात. अशातच बॅक्टेरिया हातावर जमा होऊ शकतो. त्यापेक्षा साबणाने हात धुणे नेहमीच उत्तम. परंतु तो साबण कोणत्या दुसऱ्या कामांसाठी वापरु नका.


हेही वाचा- बर्फ टाकून उसाचा रस म्हणजे पोटात गडबड

First Published on: May 10, 2023 4:52 PM
Exit mobile version