Saturday, May 18, 2024
घरमानिनीHealthMonsoon: पावसाळ्यात होणाऱ्या 'या' आजारांपासून दूर राहण्यासाठी खास टीप्स

Monsoon: पावसाळ्यात होणाऱ्या ‘या’ आजारांपासून दूर राहण्यासाठी खास टीप्स

Subscribe

उन्हाळ्यानंतर आता पावसाळा सुरु झालायं. याच दरम्यान आजार ही वाढतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे असते. कारण पावसाळ्यात किटाणू अधिक सक्रिय होत असल्याने विविध प्रकारचे संक्रमण होण्याची शक्यता वाढली जाते. पावसाळ्यात सर्वसाधारपणे स्किन एलर्जी, मलेरिया आणि फ्लू इंन्फेक्शन. या समस्यांपासून दूर राहणे फार कठीण होते आणि याचे परिणाम दीर्घकाळापर्यंत राहतात. मात्र पावसाळ्यात काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून आणि हायजीन रुटीन फॉलो करुन हेल्दी ठेवू शकता. आता पाहूयात पावसाळ्यात होणारे आजार आणि तुम्ही त्यापासून कसा बचाव कराल याच बद्दलच्या खास टीप्स.

-मच्छरांच्या माध्यमातून फैलावणारा आजार
मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया असे आजार पावसाळ्यात वाढले जातात. खरंतर पावसाळ्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले जाते आणि त्याचसोबत घाण ही वाढली जाते. याच कारणास्तव मच्छरांची सुद्धा वाढ होते. अशातच मलेरिया, डेंग्यू किंवा चिकनगुनियासारखे आजार होऊ शकतात.

- Advertisement -

-एयरबोर्न डिजीज
पावसाळ्यात सर्दी, ताप, इंन्फूएंजा, घसा खवखवणे किंवा अन्य एयरबोर्न इंन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशा समस्या एयरबोर्न बॅक्टेरिया द्वारे फैलाव होतो. तर आरोग्याप्रति जरा जरी चुक केली तर अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. खासकरुन अशा लोकांना ज्यांचे इम्युन सिस्टिम कमजोर आहे. जसे की, वृद्ध महिला आणि मुलांना असे संक्रमण आजार होण्याची अधिक शक्यता असते.

- Advertisement -

-वॉटर बोर्न डिजीज
मॉन्सूनमध्ये वॉटर बोर्न डिजीज जसे की, डायरिया, जौंडिस, हेपेटाइटिस ए, टाएफाइज, हैजा,पोट दुखण्याची समस्या होऊ शकतात. बहुतांशवेळा संक्रमण हे दुषित पाण्यामुळे फैलावू शकते. जसे की, सीवेज पाइप, खड्ड्यांमध्ये जमा झालेले पाणी. कंटेनर मध्ये जमा झालेले अनसॅनिटरी पाण्याचा वापर जर जेवण बनवणे आणि अन्य घरगुती कार्यांसाठी केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात बहुतांश लोक आजारी पडतात.

-वायरल इंफेक्शन
पावसाळ्यात वायरल इंफेक्शन होण्याची शक्यता असते. यामध्ये फंगल इंफेक्शन, बॅक्टेरियल इंन्फेक्शन स्टमक इंन्फेक्शन आणि फुट इंन्फेक्शनचा समावेश आहे. अशातच तुमची इम्युनिटी सुद्धा प्रभावित होऊ शकते. मॉन्सूनमध्ये लोक मोठ्या संख्येने वायरल डिजीजने प्रभावित होतात.

-निमोनिया
मॉन्सूनमध्ये निमोनिया सारखे आजार होऊ शकतात. निमोनिया निर्माण करणारे बॅक्टेरिया आणि व्हायरल हवेत असतात. त्यामुळे श्वास घेताना आपल्या शरिरात त्यांचा प्रवेश होतो आणि आपण संक्रमित होतो. यामुळे फुफ्फुसात हवा भरली जाते आणि सूज येते. ही स्थइती फ्लूएड जमा होण्याचे कारण ही ठरु शकते. या वायरसमुळे जीव सुद्धा जाऊ शकतो. हे संक्रमण लहान मुलं ते 65 वर्षावरील वृद्धांना होण्याची शक्यता अधिक असते. थंडी, ताप, थकवा, भूक लागणे, अस्वस्थता, त्वचा चिकट होणे, घाम येणे, डोकं दुखणे किंवा श्वास घेण्याची समस्या सुद्धा होऊ शकते.

मान्सूनमध्ये होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी खास टीप्स
-पोषक तत्व युक्त सुपरफूड्सचे सेवन करा. यामुळे तुमची इम्युनिटी बुस्ट होईल.
-पूर्ण कपडे घालण्याचा प्रयत्न करा. यामुळे मच्छरांपासून बचाव होईल.
-घराच्या आसपास पाणी जमा होऊ देऊ नका.
-हैजा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टला प्रभावित करतो. त्यामुळे डिहाइड्रेशन आणि डायरिया होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मान्सून मध्ये उकळलेले पाणी किंवा स्वच्छ पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
-टाइफाइड पासून दूर राहण्यासाठी पर्सनल हाइजीनसह आसपास च्या सॅनिटेशनवर लक्ष द्या.
-लेप्टोस्पायरोसिस पासून दूर राहण्यासाठी पाणी साठलेल्या ठिकाणांपासून दूर रहावे.


हेही वाचा- Monsoon: पावसाळ्यात Periods मध्ये घ्या ‘ही’ काळजी

- Advertisment -

Manini