Saturday, May 4, 2024
घरमानिनीReligious'या' आहेत महादेवांच्या प्रिय राशी; करतात सर्व मनोकामना पूर्ण

‘या’ आहेत महादेवांच्या प्रिय राशी; करतात सर्व मनोकामना पूर्ण

Subscribe

ज्योतिष शास्त्रातील 12 राशींवर वेगवेगळ्या ग्रहाचा तसेच वेगवेगळ्या देवी-देवतांचा आशिर्वाद प्राप्त असतो. अशाच काही राशींवर महादेवांची विशेष कृपा असते. ज्यामुळे त्या व्यक्तींना आयुष्यात कधीही मोठ्या समस्येचा सामना करावा लागत नाही. शिवाय त्यांच्या आयुष्यातील मनोकामना महादेव लवकर पूर्ण करतात.

‘या’ 3 आहेत महादेवांच्या प्रिय राशी

  • मेष

12 राशीतील पहिल्या स्थानावर असलेल्या मेष राशींच्या व्यक्तींवर महादेवांची विशेष कृपा असते. महादेवांना ही रास अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी सोमवारी आणि प्रदोषच्या दिवशी आवर्जून महादेवांची पूजा करावी.

- Advertisement -
  • मकर

महादेवांना मकर रास देखील अत्यंत प्रिय आहे. महादेवांच्या कृपेने यांना आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते. या व्यक्तीनी नेहमी महादेवांची पूजा-आराधना करावी. शिवलिंगावर जल अर्पण करावे.

  • कुंभ

कुंभ रास देखील महादेवांना अत्यंत प्रिय आहे. या राशीच्या व्यक्तींनी आयुष्यातील संकटं दूर करण्यासाठी दररोज एक माळ ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करावा.


हेही वाचा :

सूर्याच्या राशीपरिवर्तनाने ‘या’ 3 राशींची होणार चांदी

- Advertisment -

Manini