हिवाळ्यात अनेक भाज्या असतात ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मुळा ही या भाज्यांपैकी एक आहे जी तुम्हाला अनेक आजारांपासून लांब ठेवते. तसेच त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात आढळतात. विशेषतः हे लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे. मुळा खाल्ल्याने लिव्हरच्या आरोग्याला चालना मिळते.
यासोबतच मुळा खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होते. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहू शकता. अशातच मुळा लिव्हरसाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला फॅटी लिव्हर, कावीळ किंवा टायफॉइड यांसारख्या लिव्हरच्या आजारांनी तुम्ही ग्रासले असेल तर या समस्यांवर मुळा रामबाण उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया हेल्दी लिव्हरसाठी मुळा कसा फायदेशीर आहे.
मुळा खाण्याचे फायदे काय काय आहेत…
- मुळा हा अँटिऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे. तसेच त्यात व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळते. तुम्ही तुमच्या आहारात मुळ्याचा रस, सूप समाविष्ट करू शकता. यामुळे लिव्हरच्या पेशींचे संरक्षण होते.
- मुळ्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक घटक असतात जे लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
- मुळा मध्ये ग्लुकोसिनोलेट्स सारखे घटक असतात. जे लिव्हर साफ करण्यास मदत करतात. मुळा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहू शकता.
- मुळ्यामध्ये कमी कॅलरी असते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी त्यांच्या आहारात मुळ्याचा समावेश करावा. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे.
- मुळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवते. तसेच लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरेसे असावे.