Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthगवती चहाच्या सेवनाने करा 'या' आजारांवर मात

गवती चहाच्या सेवनाने करा ‘या’ आजारांवर मात

Subscribe

हिवाळा सुरु झाला की अनेकांना सर्दी, खोकला देखील सुरु होतो. अनेकदा औषधं घेऊनही सर्दी, खोकला लवकर बरा होत नाही. अशावेळी औषधांसोबतच आयुर्वेदिक उपायांचा देखील चांगला फायदा होतो. गवती चहाच्या सेवनाने देखील तुम्ही सर्दी, खोकल्यासोबत अनेक आजार बरे करु शकता.

गवती चहाच्या सेवनाने करा आजारांवर मात

Gavati Chaha In English - Benefits, Uses & Side Effects

- Advertisement -
  • सर्दी, पडसे

सर्दी, पडसे असेल तर अशावेळी गवती चहा घालून कडक असा चहा घ्यावा. यामुळे चागंला आराम मिळतो.

  • ताप

बऱ्याचदा ताप आला की, तो सहजासहजी जात नाही. अशावेळी ताप आलेल्या व्यक्तींने गवती चहा घातलेल्या चहाचे सेवन केल्यास घाम येतो आणि ताप देखील उतरतो.

- Advertisement -
  • पोटदुखी

अजीर्णामुळे पोट दुखत असेल तर गवती चहाच्या तेलाचे दोन थेंब बत्ताशावर टाकून खायला द्यावे. यामुळे पोटदुखी थांबते.

Discover the Greek herbal tea that gives you energy and boosts libido! - Hellenic Daily News

  • उलटी, जुलाब

उलटी, जुलाब होत असेल तर गवती चहाचे सेवन करावे. यामुळे उलटी, जुलाब थांबण्यास मदत होते.

  • जुनी सर्दी

गवती चहा, पुदिना, दालचिनी, आलं समप्रमाणात घेऊन त्यात पाणी आणि गूळ मिसळून काढा करावा. हा काढा अर्धा कप प्रमाणात रोज रात्री प्यावा आणि ऊबदार कपडे, पांघरुण घेऊन झोपावे. यामुळे जुनी सर्दी पडसे कमी होते.

 


हेही वाचा :

थंडीत हे पदार्थ खाणे टाळा, फिट राहा

- Advertisment -

Manini