स्मोकिंगमुळे केवळ हृदयालाच नाहीतर मेंदूलाही धोका

स्मोकिंगमुळे केवळ हृदयालाच नाहीतर मेंदूलाही धोका

स्मोकिंग हे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होत असतो. आपल्या सर्वाना माहीतच असेल की, स्मोकिंगचा आपल्या फुफ्फुसांवर सर्वात जास्त परिणाम होत असतो. याने फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचाही धोका असतो.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, स्मोकिंगचा दुष्परिणाम केवळ फुफ्फुसांवर होत नाही तर मेंदूवरही होतो. एका अभ्यास्यातून हे सिद्ध झाले आहे. अमेरिकेच्या वाशिंग्टन स्कुल ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार स्मोकिंगमुळे मेंदूवरही परिणाम होतो. स्मोकिंगमुळे मेंदू संकुचित होतो आणि कालांतराने याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. स्मृतीभंश या आजाराचा धोकाही निर्माण होतो. स्मोकिंग करणारी व्यक्ती इतर व्यक्तीच्या तुलनेत लवकर म्हातारी होते. पण स्मोकिंग करणे सोडल्यास ब्रेन टिशूचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. पण संकुचित झालेला मेंदू हा पुन्हा कधीच मूळ आकारता आणता येत नाही.

जाणून घेऊयात मेंदू संकुचित झाला असल्याची लक्षणे,

धूसर दृष्टी – स्मोकिंग केल्याने तुमची दृष्टी धूसर होत जाते. तुम्हाला अस्पष्ट दिसायला सुरुवात होते.

अल्झायमर – अल्झायमर म्हणजे विसरण्याचा आजार. सामान्यतः साठी नंतर हा आजार होण्याची शक्यता असते. पण तुम्हाला जर स्मोकिंगचे व्यसन असेल तर हा आजार तुम्हाला कमी वयात होण्याची शक्यता निर्माण होते.

डिमेन्शिया – डिमेन्शिया म्हणजे स्मृतीभंश. स्मृतीभंश म्हणजे केवळ गोष्टी विसरणे नाही. यासह गोंधळ उडणे, दिशाभूल होणे हेही याची लक्षणे आहेत.

टेन्शन – स्मोकिंग केल्याने तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. परिणामी, स्ट्रेस , टेन्शन यासारख्या समस्या भेडसावू
लागतात.

सुरकुत्या वाढणे – वाढत्या वयानुसार सुरकुत्या येणाच्या समस्या जाणवू लागतात. पण, जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर ही समस्या तुम्हाला कमी वयातच ग्रासू शकते.

नखे आणि दात पिवळे पडणारे – स्मोकिंग केल्याने तुमची नखे आणि दातही पिवळे पडू लागतात.

 


हेही वाचा ; वर्कआऊटनंतर प्रोटीन शेक पिणं धोक्याचं

First Published on: January 12, 2024 6:18 PM
Exit mobile version