एक महिना बटाटा खाणे सोडा, शरीरात दिसतील ‘हे’ बदल

एक महिना बटाटा खाणे सोडा, शरीरात दिसतील ‘हे’ बदल

भारतीय जेवणांमध्ये बटाट्याचा वापर सर्वाधिक केला जातो. साधारण प्रत्येक भाजीमध्ये बटाटा हा असतोच. अगदी बटाट्याच्या काचऱ्या ते बटाटे वडे, पापड, कीस, चकल्या, ठेचा.. जी म्हणाल ती रेसिपी बटाटा वापरून करता येते. अगदी एवढंच नाही कधी भाताबरोबर डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर पटकन बटाटा आणि चार मसाले घालून पुलाव करता येतो. भाजीत- डाळीत मीठ-तिखट कमी जास्त पडलं तरी बटाटा आपली रेसिपी फसण्यापासून वाचवतो.
पण कितीही फायदे असले तरी प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात हे विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे बटाट्याचे अधिक सेवन हे आरोग्याला धोकादायक ठरू शकते. वजन कमी करण्यापासून ते रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत अनेक फायद्यांसाठी बटाट्याचे सेवन कमी किंवा बंद करण्यास सांगितले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की जर तुम्ही एक महिन्यापर्यंत बटाटा सोडला तर तुमच्या शरीरात काय बदल होतील.

शुगर लेव्हल

बटाट्यामध्ये मोठ्या संख्येने कॅलरीज असतात. जर तुम्ही याचे सेवन करत नसाल तर शरीरात फॅट वाढणार नाही. बटाट्यामध्ये स्टार्च असते जे ब्लड शुगर वाढ होऊ शकते. शरीरातील साखरेची पातळी अनियंत्रित असेल तर बटाटे खाणे टाळावे.

ब्लड प्रेशर

बटाटे खाल्ल्याने बीपी वाढते. संशोधनानुसार, आठवड्यातून चार किंवा अधिक वेळा भाजलेले, उकडलेले किंवा मॅश केलेले बटाटे खाऊ नयेत. त्यामुळे रक्तदाबाचा धोका वाढतो. रक्तदाब टाळण्यासाठी बटाटे खाणे पूर्णपणे बंद करणे देखील आवश्यक नाही. पण प्रमाणाबाहेर खाऊ नये.

लठ्ठपणा 

बटाटे खाल्ल्याने लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा परिस्थितीत वाढणारे वजन नियंत्रणात आणायटे असेल तर बटाटे खाणे बंद करावे लागेल. बटाटे खाल्ल्याने कॅलरीजदेखील वाढतात.

पोटात गॅस 

बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटातील गॅस वाढू शकतो. अतिप्रमाणात बटाटे खाणे हे गॅस वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. गॅसच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी बटाटे खाणे टाळावे. जेवणात कमी प्रमाणातच बटाटे वापरावेत तसंच फास्ट फुडमध्ये असलेले बटाट्याचे पदार्थही टाळावेत. रोज बटाटे खाल्ल्याने फॅटदेखील वाढते.

सांधेदुखीचा त्रास

जास्त बटाटे खाल्ल्याने अॅलर्जी होऊ शकते. वास्तविक, बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आढळतात ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. अशा परिस्थितीत सांधेदुखीच्या रुग्णांनी बटाट्याचे सेवन कमी करावे किंवा करू नये.

First Published on: February 22, 2024 3:11 PM
Exit mobile version