Back Pain : पाठदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ आसनाने मिळेल फायदा

Back Pain : पाठदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ आसनाने मिळेल फायदा

बहुतेक लोकांना पाठदुखीची समस्या भेडसावत आहे आणि प्रत्येक ऋतूमध्ये ही वेदना त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देते. झोपेतून उठल्यानंतर अनेक वेळा पाठ आणि कंबरेत तीव्र वेदना होतात. त्यामुळे योगासने आराम देण्यास मदत करतात. पाठदुखीचा त्रास होत असेल तर ही योगासने फायदेशीर ठरतील. योगासनांमुळे शरीरातील वेदना कमी होतात आणि सुस्ती दूर होते. चला तर जाणून घेऊया असे योगासन, जे पाठ आणि शरीराच्या दुखण्यासोबतच सुस्तीपासून मुक्त होण्यास मदत करेल.

भुजंगासन 

हे आसन आपल्या आरोग्याासाठी फायदेशीर आहे. हे आसन केल्याने पाठदुखीसह हातांचे स्नायूही मजबूत होतात. त्यासोबतच ही आसने कंबर आणि पोटाची चरबी कमी करण्यास साह्यभूत ठरतात.

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन केल्याने खांदा आणि मणका ताणला जातो. त्यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो. यासोबतच हे आसन डोकेदुखी आणि सुस्ती दूर करते. उच्च रक्तदाब, निद्रानाश बरा करण्यासोबतच पश्चिमोत्तनासन केल्याने मन शांत राहते आणि तणाव दूर राहतो. हे करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर बसा. दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने पुढे करा. श्वास घ्या आणि हळू हळू हात वर करुन हळू हळू खाली वाका आणि संपूर्ण पायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा.

बाल मुद्रा

हा एक अतिशय सामान्य योगासनाचा प्रकार आहे. हे आसन केल्यामुळे पाठीच्या खालच्या भागाचे स्नायू हळूहळू पसरतात. जे दुखत असताना आकुंचन पावलेले असतात. आसन करण्यासाठी आपले गुडघे आणि तळहात अश्या पोझमध्ये ठेवावे जसे लहान मूल पाठीवर बसलेले आहे. तळवे जमिनीवर ठेवून, दीर्घ श्वास घ्या आणि हातांच्या साहाय्याने ते समोर पसरवा. आणि नितंब मागे घेऊन टाचांवर बसा.

गुडघा ते छाती ताणणे

या आसनामुळे पाठीचे स्नायू आकुंचन पावतात. गुडघ्यापासून छातीपर्यंत ताणल्याने पाठीच्या खालच्या दुखण्यापासून निश्चितच आराम मिळतो.

पाठदुखी कमी करण्यासाठी व्यायामाव्यतिरिक्त तुम्ही इतरही अनेक गोष्टी करू शकता : 

सकस आहाराचा समावेश करा

पाठदुखीसह अन्य दुखणे मुळापासून नष्ट करण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणात सकस आहाराचा समावशे करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी 3, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, हिरव्या भाज्या खाल्ल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. जर तुम्ही मांसाहार करू शकत असाल तर आहारात माशांचा नक्कीच समावेश करा. यातून आपली हाडे मजबूत होत असतात.

First Published on: March 15, 2024 11:25 AM
Exit mobile version