Sunday, May 19, 2024
घरमानिनीHealthउन्हाळ्यातील आजार, लक्षणे आणि काळजी

उन्हाळ्यातील आजार, लक्षणे आणि काळजी

Subscribe

उन्हाळा सुरु झाला की, उन्हामुळे आणि घामामुळे सर्वच हैराण होतात. उन्हाचे चटके आणि घामासोबतच उन्हाळा काही रोगांनाही सोबत घेऊन येतो. अशा वेळी आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचे असते. कारण जर हे आजार गांभीर्याने न घेतल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. उन्हाळयात कोणते आजार होतात त्यांची लक्षणे काय आहेत, यावर उपाय म्हणून आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात,

उष्माघात –
उन्हाळ्यात होणारा सर्वात सामान्य आजार म्हणजे उष्माघात. जास्त वेळ उन्हाळ्यात राहिल्यास उष्माघाताचा त्रास जाणवू लागतो. डब्लूएचओच्या मते, उष्माघात झाल्यास तीव्र डोकेदुखी, तीव्र ताप, उलट्या चक्कर येणे, अशक्तपणा यासारखी लक्षणे जाणवतात. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी कधीही रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका. हायड्रेटेड राहा शक्य तितके उन्हात स्वतःला झाकून ठेवा.

- Advertisement -

अन्नातून विषबाधा –
उन्हाळयात अन्नातून विषबाधा होणे हा सामान्य आजार आहे. अन्नातून विषबाधा दूषित पाणी किंवा अन्नाच्या सेवनामुळे होते. या ऋतूत बॅक्टेरिया, बुरशी झपाट्याने वाढतात. अशा वेळी कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया, बुरशी पोटात गेल्यास अन्नातून विषबाधा होऊ शकते. याची लक्षणे म्हणजे पोटदुखी, मळमळ, जुलाब, ताप. त्यामुळे या ऋतूत रस्त्यावरचे अन्न, कच्चे मांस, उघड्यावर विकले जाणारे अन्न, थंड अन्न, शिळे अन्न आदी टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

वायरल फिवर –
जास्त ताप, अंगदुखी, सर्दी, डोकेदुखी यासारखी लक्षणे वायरल फिवरमध्ये दिसून येतात. हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही योग्य प्रमाणात हलक्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते.

- Advertisement -

त्वचेवर पुरळ आणि उष्णता –
उन्हाळ्यात जास्त घाम येतो अशा परिस्थितीत तुम्ही टाईट फिटिंगचे कपडे घातलेत तर शरीरातून घाम बाहेर पडायला अडचणी निर्माण होऊ शकतात. अशाने त्वचेवर पुरळ, उष्णता यासारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे उन्हाळ्यात सैल आणि सुती कपडेच घालवायला हवेत.

कांजिण्या –
कांजिण्या हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. या रोगात संपूर्ण शरीरावर मोठ्या आणि लहान पु असलेले पुरळ दिसतात. जे बरे झाल्यानंतरही चट्टे तसेच रहातात. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते अशा लोकांना हा आजार सहज होऊ शकतो. हे टाळण्यासाठी नवजात बालकांना एमएमआर लस दिली जाते. कांजण्या टाळण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी.

डायरिया –
‘डायरिया’ उन्हाळयात होणारा आजार आहे. डायरिया उन्हाळयात बाहेरील पदार्थ खाल्याने होण्याची शक्यता अधिक असते. पोटावर सूज येणे, पोट दुखणे, सतत टॉयलेटला जावे लागणे ही डायरियाची लक्षणे आहेत. हळूहळू या आजाराचे अनेकदा गंभीर बघायला मिळतात. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक चांगले.

 

 


हेही वाचा : उन्हाळ्यात प्या मातीच्या भांड्यातील पाणी; होतील जबरदस्त फायदे

- Advertisment -

Manini