Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthनॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रेग्नन्सीमध्येच घ्या ही काळजी

नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रेग्नन्सीमध्येच घ्या ही काळजी

Subscribe

बाळाला जन्म देणं,आई होणं हा स्त्रीसाठी सुखद अनुभव असतो. पण  बाळाला जन्म देताना प्रत्येक स्त्रीचाही दुसरा जन्म होत असतो. बऱ्याचवेळा गुंतागुंत निर्माण झाल्याने किंवा इतर कारणामुळे महिलेची सिझेरियन डिलिव्हरी करावी लागते. पण सिझेरियनपेक्षा नॉर्मल डिलिव्हरी ही आई आणि बाळ या दोघांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यासाठी गर्भवती राहील्यापासूनच महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

डॉक्टर निवडणे

- Advertisement -

आजकाल,योग्य आणि ज्ञानी डॉक्टर निवडणे देखील खूप महत्वाचे आहे. अनेक वेळा रुग्णाची नीट तपासणी न करता आर्थिक फायद्यासाठी सिझेरियन प्रसूतीचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत, आपण आपल्या डॉक्टरांची योग्य निवड करावी. तसेच त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली दररोज किती सामान्य प्रसूती होतात तेही तपासा.

आहाराची काळजी घ्या
गरोदरपणात महिलेने आहाराची विशेष काळजी घ्यावी.अशा वेळी संतुलित आहार घेणे खूप गरजेचे असते. आई सकस आणि पौष्टिक आहार घेते तेव्हाच मुलाला त्याचा फायदा होतो. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, सामान्य प्रसूतीची शक्यता खूपच कमी असू शकते. त्यामुळे या काळात पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि सर्व प्रकारच्या कडधान्ये खाणे आवश्यक आहे.

- Advertisement -

शारीरिकरित्या सक्रिय रहा
गर्भधारणेदरम्यान शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्यास प्रसूती सामान्य होण्याची शक्यता देखील वाढते. आजच्या जीवनशैलीत स्त्रिया कमी शारीरिक श्रम करतात त्यामुळे त्यांचे शरीर नॉर्मल प्रसूतीसाठी तयार होत नाही. अशा परिस्थितीत सी-सेक्शनचा अवलंब करावा लागतो. म्हणूनच, शक्य तितके शारीरिकरित्या सक्रिय राहणे चांगले.

भरपूर पाणी प्यावे
हिवाळा असो किंवा उन्हाळा, भरपूर पाणी प्यावे. महिलांनी गरोदर असताना काळजी भरपूर पाणी प्यावे. शरीराला पुरेसे पाणी मिळाल्यावर प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन मिळतो. प्रसूतीदरम्यान होणारा त्रास सहन करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे सामान्य प्रसूती होण्याची शक्यता वाढते.

झोप
या दिवसात आई आणि बाळासाठी पुरेशी झोप गरजेची असते. त्यामुळे आईचे मन शांत राहते. शक्यतो दिवसा झोपणे टाळावे त्यामुळे रात्री तुम्हांला लवकर झोप लागणार नाही आणि तुम्ही अस्वस्थ राहाल.तसेच 7-8 तास झोप घेतल्याने देखील सामान्य प्रसूती होण्यास मदत होते.

- Advertisment -

Manini