घरक्रीडाICC Test Team: 2023 च्या सर्वोत्तम कसोटी संघात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; प्लेइंग-11 मध्ये...

ICC Test Team: 2023 च्या सर्वोत्तम कसोटी संघात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; प्लेइंग-11 मध्ये केवळ दोन भारतीय खेळाडू

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2023 चा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. संघाची कमान पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आली आहे.

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2023 चा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. संघाची कमान पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं या संघात वर्चस्व आहे. सर्वोत्तम कसोटी संघात भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन, श्रीलंका आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी एक खेळाडू आहेत. संघात चार फलंदाज, एक यष्टिरक्षक, तीन अष्टपैलू आणि तीन वेगवान गोलंदाज आहेत. (ICC Test Team Australia dominates best Test team of 2023 Only two Indian players in the playing 11)

सलामीची जबाबदारी उस्मान ख्वाजा आणि दिमुथ करुणारत्ने यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आणि जो रूट चौथ्या क्रमांकावर आहे. संघात ट्रॅव्हिस, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे तीन अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याचबरोबर कमिन्स, मिचेल स्टार्क आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या रूपाने तीन वेगवान गोलंदाज आहेत. अॅलेक्स कॅरी संघात यष्टिरक्षक फलंदाज असेल.

- Advertisement -

या संघात पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा एकही खेळाडू नाही. भारताकडून फक्त जडेजा आणि अश्विनला स्थान मिळाले आहे. तर ऑस्ट्रेलियातील ख्वाजा, हेड, कॅरी आणि स्टार्क हे स्थान मिळवण्यात यशस्वी झाले. इंग्लंडचा जो रूट आणि स्टुअर्ट ब्रॉड हे देखील प्लेइंग-11 मध्ये आहेत. ब्रॉडने गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. याशिवाय श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांचाही या संघात समावेश आहे.

ICC चा सर्वोत्तम कसोटी संघ (2023)

उस्मान ख्वाजा, दिमुख करुणारत्ने, केन विल्यमसन, जो रूट, ट्रॅव्हिस हेड, रवींद्र जडेजा, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड.

- Advertisement -

ख्वाजा आणि करुणारत्ने यांच्यावर सलामीची जबाबदारी

गेल्या वर्षी ख्वाजाने 13 सामन्यांत 52.60 च्या सरासरीने 1210 धावा केल्या होत्या. यामध्ये सहा शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. करुणारत्नेनेही गतवर्षी श्रीलंकेसाठी शानदार फलंदाजी केली होती. त्याने 60.8 च्या सरासरीने 608 धावा केल्या होत्या. 33 वर्षीय विल्यमसनने 2023चा शेवट 695 धावांसह केला. या काळात त्याने चार शतके झळकावली. विल्यमसनशिवाय रूटनेही शानदार फलंदाजी केली. त्याचा चौथ्यांदा वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय तो वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू पुरस्काराच्या शर्यतीत आहे. हेडच्या अष्टपैलू क्षमतेमुळे त्याला संघात स्थान मिळाले. हेडने गेल्या वर्षी 12 सामन्यांत 919 धावा केल्या होत्या आणि या बाबतीत केवळ दोनच खेळाडू त्याच्या पुढे होते.

भारताच्या रवींद्र जडेजाने त्याची मारक गोलंदाजी आणि गरज असताना केलेल्या शानदार फलंदाजीमुळे सर्वोत्तम कसोटी संघात स्थान मिळवले. त्याचबरोबर अॅलेक्स कॅरीने गेल्या वर्षी आपल्या यष्टिरक्षण कौशल्याने सर्वांची मने जिंकली होती. त्याने विकेटमागे एकूण 54 बळी घेतले. यामध्ये 44 झेल आणि 10 स्टंपिंगचा समावेश आहे. कॅप्टन कमिन्सने पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत त्यांना चॅम्पियन बनवले. तसेच ऍशेस राखण्यात यश मिळविले. गेल्या वर्षी त्याने 11 सामन्यांत 42 विकेट घेतल्या होत्या.

अश्विन आणि स्टार्कची घातक गोलंदाजी

भारताचा अश्विन गेल्या वर्षी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने चार सामन्यांत 25 बळी घेतले होते. गेल्या वर्षी चमकदार गोलंदाजी करूनही अश्विनला डब्ल्यूटीसी फायनलच्या प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळविता आले नव्हते, पण आयसीसीने अशी चूक केली नाही. त्याचबरोबर स्टार्कने 2023 मध्ये नऊ सामन्यांत 38 विकेट घेतल्या होत्या. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या स्टुअर्ट ब्रॉडच्या नावाचाही समावेश आहे. गेल्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेसमध्ये सर्वाधिक 22 विकेट घेतल्या होत्या.

(हेही वाचा: Sushama Andhare : देवाभाऊंनी ‘पहाटे-दुपारी’ दोनदोनदा लव्ह मॅरेज केलं; श्रीरामाचा दाखला देत अंधारेंची टीका )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -