Thursday, September 21, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen Paneer Popcorn : चटपटीत पनीर पॉपकॉर्न

Paneer Popcorn : चटपटीत पनीर पॉपकॉर्न

Subscribe

पनीर पॉपकॉर्न हे पावसाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम स्नॅक्सपैकी एक आहे कारण ते कुरकुरीत गोडपणा आणि खमंग चव यांचे उत्तम मिश्रण आहे.

साहित्य

 • 200 ग्रॅम पनीर त्याचे 1-इंच चौकोनी तुकडे करा
 • 1/4 कप – मैद्याचे पीठ
 • 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
 • 1 टीस्पून हळद पावडर
 • 1 टीस्पून लाल मिरची पावडर
 • 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर
 • 1 टीस्पून मीठ
 • 1/4 कप ब्रेडचे तुकडे
 • तळण्यासाठी तेल

சிறுவர்களுக்கு பிடித்த..மொறு மொறு பன்னீர் பாப்கார்ன்! | The childrens favourite.. crunchy paneer popcorn! | Dinamalar

कृती

 • एका भांड्यात मैदा, आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ एकत्र करा.
 • आता पनीरचे चौकोनी तुकडे पिठात बुडवून, समान रीतीने कोटिंग करा.
 • यानंतर एका वेगळ्या वाडग्यात, ब्रेडचे तुकडे एकत्र करा.
 • पनीरचे चौकोनी तुकडे ब्रेड क्रंबमध्ये रोल करा, त्यांना व्यवस्थित लेप करा.
 • आता एका जाड तळणीत तेल मध्यम आचेवर गरम करा.
 • तेल गरम झाल्यावर काळजीपूर्वक पनीरचे चौकोनी तुकडे त्यात घाला.
 • पनीरचे चौकोनी तुकडे प्रत्येक बाजूला 2-3 मिनिटे सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
 • नंतर तेलातून पनीरचे चौकोनी तुकडे काढून घ्या आणि आता टिश्यूपेपरवर ठेवा.
 • हे झाल्यावर डिपिंग सॉस आणि गरम चहा सोबत पनीर पॉपकॉर्न गरमागरम सर्व्ह करा.

हेही वाचा :

उरलेल्या भाताची बनवा कुरकुरीत भजी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini