घरदेश-विदेशCrime : आर्थिक फसवणूक करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला इंग्लंडमध्ये दोन वर्षाची शिक्षा

Crime : आर्थिक फसवणूक करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला इंग्लंडमध्ये दोन वर्षाची शिक्षा

Subscribe

भारतीय वंशाचे असलेला सनी भयानी याने त्याचा पदाचा वापर करून आर्थिक फसवणूक केली होती.

इंग्लंड : पदाचा गैरवापर करून एक नव्हे तर तब्बल 50 हजार पाउंडसची फसवणूक करणाऱ्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीस इंग्लंड न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा आज झालेल्या सुनावणीत सुनावण्यात आली. सनी भयानी असे आरोपीचे नाव असून, त्याचे वय 62 वर्ष आहे.(Crime A person of Indian origin who committed financial fraud was sentenced to two years in England)

भारतीय वंशाचे असलेला सनी भयानी याने त्याचा पदाचा वापर करून आर्थिक फसवणूक केली होती. टेम्स व्हॅली पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे गेल्या आठवड्यात आयलेसबरी क्राउन कोर्टाने त्याला दोन वर्षांच्या पदावरून निलंबित केले आणि कोर्टाने त्याच्यावर फसवणुकीचा आरोप लावला होता त्याच रकमेसाठी त्याला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्याने केलेल्या फसवणुकीची रक्कम परत करण्याचे आदेशही दिले आहेत.

- Advertisement -

पाच वर्षापासून सुरू होता तपास

टेम्स व्हॅली पोलिसांचे तपास अधिकारी जेम्मा थॉम्पसन यांनी म्हटले की, ही एक असाधारण आणि खुप काळ चाललेल्या तपासापैकी एक तपास आहे. यासाठी तब्बल पाच वर्ष लागली. सध्या एकजण आमच्या गळाला लागला असून, या फसवणूक प्रकरणात आणखी काही जण अडकण्याची शक्यता आहे अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : Imran Khan : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना न्यायालयाकडून मोठा झटका, 9 जामीन अर्ज फेटाळले

- Advertisement -

भयानी याने उचलला पदाचा फायदा

तपास अधिकारी यांनी माहिती दिली की, भयानी याच्याकडे कंपनीचे मोठे आणि महत्वाचे पद होते. त्याने कंपनीची विश्वासहार्यतेला तडा देत आर्थिक फसवणूक केली. त्याला मिळालेल्या शिक्षेबाबत आपण आनंदी असून, त्याने केलेल्या फसवणुकीची रक्कम त्याला परत करावी लागणार असल्याचेही तपास अधिकाऱ्यांने सांगितले.

हेही वाचा : पंतप्रधानाच्या घोषणेनंतर 24 तासांच्या आत विश्वकर्मा योजनेला हिरवा कंदील; कोणाला होणार फायदे, वाचा-

2017-18 मध्ये केली होती फसवणूक

कोर्टाने केलेल्या सुनावणीत म्हटले आहे की, आरोपीने 2017-18 या वर्षात ही आर्थिक फसवणूक केली आहे. तो ग्राहकांकडून खोटे रिफंड बिले दाखवून कंपनीची फसवणूक करीत होता. त्याने 51 हजार 794 ब्रिटेन पाउंडची फसवणूक केल्याचे उघड झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -