अंड आवडत नसेल तर ‘या’ पदार्थांचे करा सेवन

अंड आवडत नसेल तर ‘या’ पदार्थांचे करा सेवन

egg alternatives

अंड हे सुपरफूड असे म्हटले जाते. प्रोटीन व्यतिरिक्त यामध्ये काही प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सुद्धा असतात जे आरोग्यासाठी हेल्दी मानले जातात. परंतु काही लोक असे असतात जे विविध कारणास्तव अंड खात नाहीत. त्यामुळे त्या लोकांना प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि महत्वाचे मिनिरल्स मिळत नाही का? तर असे नाही. त्यामुळे अंड्याऐवजी तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Egg alternatives)

टोफू


सोयाबिन हा प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यापासून तयार केला जाणारा टोफू सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. टोफू प्रोटीन व्यतिरिक्त लोह, कॅल्शियम आणि अन्य खनिजांनी समृद्ध असतो. एका अभ्यासात असे समोर आले आहे की, टोफू हा अंड्यासाठी एकदम बेस्ट पर्याय असू शकतो. खासकरुन बेकिंग आणि स्क्रॅम्बल्समध्ये. टोफू हा नरम आणि याची टेस्ट हलकी ऑमलेट सारखी असते. पण यामध्ये फायबर, कॅल्शियम आणि अँन्टीऑक्सिडेंट सुद्धा असते.

चिया सीड्स


चिया सीड्स आपल्या अनोख्या गुणांमुळे एक ट्रेंन्डी सुपरफुड झाले आहे. पाण्यात मिक्स केल्यानंतर चिया सीड्स हे एखाद्या जेलसारखे दिसते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, ग्लुटेन फ्री बेक्ड फूड्स मध्ये बाइंडिंगसाठी चिया सीड्स हे अंड्यासमानच असतात. चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे प्रमाण भरपूर प्रमाणात असण्यासह फाइबर, कॅल्शियम आणि अँन्टीऑक्सिडेंट सुद्धा असतात.

अळशी


चिया सीड्स प्रमाणेच अळशी मध्ये सुद्धा बाइंडिंग एजेंट असतात. अंड्याऐवजी हा बेस्ट पर्याय आहे. एका अभ्यासानुसार कुकीज, मफिन आणि ब्रेडमध्ये अंड्याऐवजी अळशीचा वापर केला गेला. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. जे हार्टसाठी फार उत्तम मानले जाते. पाचनक्रिया सु्धारते. अंड्याला पर्याय म्हणून अळशीचा वापर तुम्ही त्याची पूड करु कोमट पाण्यासह ही पिऊ शकता.

एक्वाफाबा


एक्वाफाबा, डब्बाबंद छोल्यांमध्ये आढळणारे लिक्विड आहे. जे घरी सुद्धा तयार केले जाऊ शकते. याचे पाणी शाहाकारी लोक अंड्याच्या ऑप्शनच्या रुपात करतात. एका अभ्यासातून असे समोर आले आहे क, मेरिंग्यू, मूस आणि बेक्ड पदार्थ तयार करण्यासाठी अंड्याच्या ऑप्शनच्या रुपात एक्वाफाबाचा वापर केला जाऊ शकतो. एक्वाफाबामध्ये कॅलरीज कमी असतात पण प्रोटीन, फायबर भरपूर प्रमाणात असते. (Egg alternatives)

अॅप्पल सॉस


अॅप्पल सॉसचा वापर बेकिंग डिशेजसह मफिन, केक आणि कुकीडसाठी केला जाो. अंड्याला पर्याय म्हणून तो वापरला जाऊ शकतो. अॅप्पल सॉस मध्ये असलेली नैसर्गिक साखर एक्स्ट्रा फॅटची गरज कमी करत फाइनल प्रोडक्टमध्ये गोडवा आणि नरमपणा आणतो. एका अभ्यासात असे समोर आले आहे की, अॅप्पल सॉसचा वापर हा अधिक प्रमाणात बेकिंगच्या पदार्थांसाठी केला जातो. अॅप्पल सॉस फायबर, व्हिटॅमिन आणि अँन्टीऑक्सिडेंटचा एक समृद्ध स्रोत आहे.


हेही वाचा- Health care : कापलेल्या फळांवर मीठ किंवा मसाले टाकू नका,पडेल महागात

First Published on: June 4, 2023 12:51 PM
Exit mobile version