Tuesday, May 7, 2024
घरमानिनीKitchenNavratri 2023 : देवी दुर्गेसाठी बनवा बुंदीचे लाडू

Navratri 2023 : देवी दुर्गेसाठी बनवा बुंदीचे लाडू

Subscribe

जर तुम्ही मिठाई खाण्याचे शौकीन असाल तर नक्कीच तुम्ही अनेक प्रकारच्या मिठाई खाल्ल्या असतील. पण तुम्ही कधी बुंदीचे लाडू खाल्ले नसतील तर आज आम्ही तुम्हाला बुंदीच्या लाडूची रेसिपी सांगणार आहोत जी अगदी सोपी तर आहेच आणि खायला देखील हे लाडू छान चविष्ट लागतात. चला तर मग जाणून घेऊया बुंदीचे लाडू कसे बनवायचे.

साहित्य

  • 1 किलो बेसन पीठ
  • गरजेनुसार पाणी
  • चिमुटभर मीठ
  • बुंदी तळण्यासाठी तेल
  • अर्धा किलो साखर
  • वेलची पुड / जायफळ पुड-  चवीनुसार
  • चारोळी

boondi ladoo - Chef Kunal Kapur

कृती

  • बेसन पीठ चाळून घ्यावे. मग त्यात पाणी घालत पीठ एकसारखे भिजवुन घ्या.
  • पीठ भिजवताना त्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
  • पीठ 1 ते दिड तास भिजत ठेवा. नंतर मोठया कढईत तेल गरम करत ठेवावे.
  • पुन्हा एकदा पीठ एकसारखे करून घ्यावे. यानंतर झाऱ्याच्या साह्याने बुंदी तेलात पाडाव्यात.
  • मध्यम आचेवर बुंदी सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
  • हे झाल्यावर एका मोठ्या पातेल्यात साखर घेऊन, साखर चांगली भिजण्या इतपत पाणी घालावे. आणि ते उकळायला ठेवावे.
  • साखरेचा एकतारी पाक करून घ्यावा. मग चारोळी, वेलची पूड पाकात घालावी.
  • वरून बुंदी घालून एकजीव करून घ्यावे. सगळी बुंदी पाकात एकसारखी मिक्स करून घ्यावी.
  • पाक पुर्ण मुरण्यास ठेवावे. यानंतर एक तासानंतर बुंदी थंड झाल्यावर एकसारखे करून घेणे.
  • आणि मग परातीमध्ये थोडे – थोडे पीठ घेऊन लाडु वळून घ्यावे.

हेही वाचा : Navratri 2023 : वरीपासून बनवा उपवासाचे अनारसे

- Advertisment -

Manini