घरक्राइमBeed Crime: विवस्त्र महिलेचा व्हिडीओ व्हायरल; भाजप आमदार आणि पत्नीसह दोन जणांविरोधात...

Beed Crime: विवस्त्र महिलेचा व्हिडीओ व्हायरल; भाजप आमदार आणि पत्नीसह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

बीड : बीडमध्ये विवस्त्र महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आणि त्यांची पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही घटना जमिनीच्या वादातून झाल्याची माहिती मिळाली आहे. धस कुटुंबीयांनी पीडित महिलेच्या जमीनीवर दावा सांगितल्यानंतर हा वाद झाला. या पीडित महिलेचे कपडे फाडल्याची माहिती समोर येत असून विवस्त्र महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर विनयभंग आणि अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात गुन्ह्यात आमदार सुरेश धस आणि त्यांची पत्नीसह आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या जमिनीचा वाद सोडवण्यासाठी आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस येथे गेल्या होत्या. पण जमिनीचा वाद सोडण्याऐवजी वाद वाढत गेला. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर चार जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तापस पोलीस तकर आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ड्रग्ज प्रकरणात आणखी एक अटक; ललित पाटीलचा साथीदार अन्सारी पोलिसांच्या ताब्यात

पीडित महिलेने तक्रारी काय म्हटले

पीडित महिलेने पोलीस तक्रारी म्हटले की, पीडित महिला (40 वर्ष) त्यांच्या अनेक वर्षांपासून वाळुंज शिवारातील जमीन त्या कसत आहेत. पण राहुल आणि रघु हे दोन माझ्या जवळ आले आणि मला खड्ड्यात पाडले. या दोघांनी माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस याठिकाणी उपस्थित होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -