Friday, May 17, 2024
घरमानिनीRecipecucumber pickle : पावसाळयात बनवा काकडीचे लोणचे

cucumber pickle : पावसाळयात बनवा काकडीचे लोणचे

Subscribe

पावसाळयात चवदार खाण्याची खूप इच्छा होते. अशातच पावसाळ्यात काय बनवायचे हा प्रश्न खूप पडतो. पण काय बनवायचे हे सुचत नाही. अशावेळी वेगवेगळ्या प्रकारची लोणची आठवतात. तर मग यंदाच्या पावसाळ्यात काकडीचे घरगुती लोणचे नक्की ट्राय करा…

साहित्य

  • 3/4 कप बारीक चिरलेली काकडी (सोललेली)
  • 2 टेस्पून मोहोरी पावडर (काळी किंवा लाल)
  • 1/4 टीस्पून हिंग
  • 2 टीस्पून पाणी
  • चवीनुसार मीठ
  • 1 टीस्पून लिंबाचा रस
  • फोडणीसाठी: 1 टीस्पून तेल, 2 चिमटी मोहोरी, 1/4 टीस्पून हिंग, 1/4 टीस्पून हळद, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून

Everything you need to know about pickling cucumbers - Farm and Dairy

- Advertisement -

कृती

  • चिरलेली काकडी एका लहान वाडग्यात घ्यावी. त्याला 1/4 चमचा मीठ लावून घ्यावे. 20 मिनिटे तसेच ठेवावे.
  • 20 मिनीटांनी काकडीला पाणी सुटेल. ते पाणी हलक्या हाताने पिळून घ्यावे.
  • हे पाणी एका लहान ब्लेंडरमध्ये घ्यावे. त्यात मोहोरी पावडर घालावी आणि फेटून घ्यावी.
  • जर मिश्रण अगदी घट्ट वाटले तर एखाद टीस्पून पाणी घालावे. हे मिश्रण काकडीत मिक्स करावे.
  • कढई मध्ये 1 टीस्पून तेल घ्यावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद,आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी द्यावी.
  • हि फोडणी एका वाटीमध्ये काढून ठेवावी. थंड झाल्यावर काकडीमध्ये मिक्स करावी.
  • आता यात लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
  • काकडीचे झटपट लोणचे जेवणात खायला किंवा पोळीबरोबर खायलाही छान लागते.
  • हे लोणचे फ्रीजमध्ये 3-4 दिवस टिकेल.

हेही वाचा :

लोणच्यामध्ये मीठ का घालतात? जाणून घ्या

- Advertisment -

Manini