Wednesday, May 1, 2024
घरमानिनीKitchenIdli Fry : उरलेल्या इडली पासून बनवा भजी

Idli Fry : उरलेल्या इडली पासून बनवा भजी

Subscribe

इडलीच्या पिठापासून अनेक पदार्थ बनवता येतात. अशातच काही काही वेळा साधी इडली खायला कंटाळा येतो. तर मग तुम्ही या इडली पासून फ्राय क्रिस्पी भजी देखील अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता.

साहित्य :

  • 1 वाटी मैदा
  • 1/2 वाटी बेसन
  • 1 चमचा लाल तिखट
  • 3-4 हिरव्या मिरच्या
  • भजीसाठी तेल
  • चवीनुसार मीठ

 

- Advertisement -

कृती :

Mexican Idli Pakora Recipe - Idli Pakoda Recipe in Hindi - How to Make Idli Pakoda at Home

 

  • सर्व प्रथम एका इडलीचे 4 तुकडे करा आणि एका भांड्यात 4 चमचे मैदा, 4 चमचे बेसन, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि 3-4 हिरव्या मिरच्या चिरून घ्या.
  • नंतर हळूहळू पाणी घालून पीठ तयार करा. लक्षात ठेवा की पीठ जास्त पातळ नसावे आणि द्रावण 5 मिनिटे झाकून ठेवावे.
  • कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर पिठात इडल्या टाकून तळून घ्या.
  • त्याच प्रकारे आपण सर्व इडल्या पिठात घालून दोन्ही बाजूंनी तळून घेऊ.
  • हे करत असताना गॅस मिडीयम आचेवर ठेवा यामुळे इडली कुरकुरीत होईल.
  • इडली तळल्यानंतर एका भांड्यात इडली काढून तुमच्या आवडीच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

हेही वाचा : Recipe : केळ्याचा पौष्टिक हलवा

- Advertisment -

Manini