आपल्यापैकी प्रत्येकीलाच आपले केस लांबसडक आणि सिल्की असावे असं वाटतं. यासाठी अनेकजणी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट देखील घेतात. पण यामध्ये खूप पैसे खर्च होतात तसेच यामध्ये केमिकलचा देखील वापर जास्त प्रमाणात केला जातो. मात्र, यामुळे केसांचे अधिक नुकसान होते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी तेल बनवून त्याचा वापर करु शकता. यामुळे तुमचे केस लांबसडक आणि सिल्की होण्यास मदत होईल.
असे तयार करा आवळा तेल
- Advertisement -
- आवळा तेल घरी बनवण्यासाठी सर्वात आधी आवळे चिरुन घ्या. त्यानंतर त्याची मिक्सरला पेस्ट लावून घ्या.
- त्यानंतर ही तयार झालेली पेस्ट नारळाच्या तेलात मिक्स करुन घ्यावी.
- हे मिश्रण घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये आठवडाभर बंद करुन ठेवा.
- त्यानंतर हे तेल गाळणीने गाळून घ्या. अशाप्रकारे हे तेल वापरण्यास तयार होईल.
- हे तेल आठवड्यातून दोन दिवस केसांना लावा आणि चांगल्या प्रकारे मसाज करा.
- त्यामुळे केसांच्या मुळांशी ते जिरण्यास मदत होईल.
- तेल लावल्यानंतर ते केसांवर साधारण पाऊण तास राहू द्यावे आणि नंतर केस नेहमीप्रमाणे धुवून घ्यावेत.
- Advertisement -
हेही वाचा :