Recipe: टेस्टी, हेल्दी असे दडपे पोहे

Recipe: टेस्टी, हेल्दी असे दडपे पोहे

घरी पाहुणे आले की नेहमीच कांदेपोहे बनवतो. पण पोह्यांपासून झटपट आणि चवीष्ट असे विविध पदार्थ ही बनवता येतात. त्यासाठी फार काही करावे लागत नाही. जसे ही दही पोहे, पोह्यांची तिखट भेळ. पण तुम्ही घरी कधी हेल्दी, टेस्टी दडपे पोहे बनवलेत का? नाही तर दडपे पोहे बनवण्याची ही सोपी पद्धत एकचा पहा.

साहित्य
-1 बारीक चिरलेला कांदा
-चवीनुसार मीठ
-चवीनुसार साखर
-लिंबाचा रस
-1 बारीक कापलेली मिर्ची
-बारीक कापलेली कोथिंबीर
-फोडणीसाठी एक चमचा तेल
-मोहरी
-कढीपत्ता
-शेंगदाणे
-1 कप जाडे पोहे
-थोडसं पाणी

कृती
एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ, साखर घाला. आता लिंबाचा रस टाका. हे सर्व मिश्रण एकत्रित चुरुन घ्या. कापलेली मिर्ची कोथिंबीर टाका. हे सर्व एकत्रित मिक्स करा.फोडणीसाठी तेल गरम करुन घेत त्यात आधी मोहरी, जीर, कढीपत्ता टाका. आता शेंगदाणे टाका आणि ते लालसर होईपर्यंत शिजण्यास ठेवा.पोह्यावर थोडसं पाणी शिंपडून बाजूला ठेवा. केलेली फोडणी ही कांद्याच्या मिश्रणात टाका. पोहे सुद्धा टाका. हे सर्व एकत्रित मिक्स करा. तयार झाली तुमची दडपे पोह्याची रेसिपी.


हेही वाचा- Recipe: झटपट होणारी पोह्यांची भेळ

First Published on: May 27, 2023 5:31 PM
Exit mobile version