Thursday, January 23, 2025
HomeमानिनीRecipeMango Shrikhand Recipe - आम्रखंड रेसिपी

Mango Shrikhand Recipe – आम्रखंड रेसिपी

Subscribe

आंब्याचा सिझन सुरू असून सध्या बाजारात मुबलक आंबा उपलब्ध आहे. यामुळे घरोघरी आंब्याचा रस, पुरी, आंब्याचे आईस्क्रिम, कुल्फी, आंब्याचे रायते, आंबा सरबत , आंबा जाम असे विविध पदार्थ आवडीने बनवले जात आहेत. पण आंब्याचे श्रीखंड म्हणजेच आम्रखंडाची बातच काही और आहे. आंब्याची प्युरी आणि दह्यापासून बनवलेले आम्रखंड कसं बनवायचं त्याची रेसिपी बघूया.

साहित्य
4 – आंबा
1 टीस्पून हिरवी वेलची
50 ग्रॅम बदाम
250 ग्रॅम साखर
एक कप दही
१ चिमूट केशर
500 मिली फुल क्रीम दूध

कृती
एका भांड्यात साखर आणि दूध घट्ट होईपर्यंत फेटत राहा. नंतर त्यात एक चमचा घट्ट दही घालून सेट होऊ द्यावे. त्यानंतर हे मिश्रण कापडात बांधा. त्यातील पाणी पूर्ण जाईपर्यंत लटकवून ठेवा. नंतर आंब्याची प्युरी , वेलची पावडर आणि केशर घालून चांगले मिक्स करावे लागेल. त्यावर चिरलेले बदाम घालून तासभर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. आम्रखंड तयार झाल्या नंतर पुरीसोबत सर्व्ह करा.


Edited By

Aarya Joshi

Manini