घरमुंबईBMC : माजी महापालिका कर्मचाऱ्यांनी हयातीचे दाखले 6 मेपर्यंत सादर न केल्यास...

BMC : माजी महापालिका कर्मचाऱ्यांनी हयातीचे दाखले 6 मेपर्यंत सादर न केल्यास निवृत्ती वेतन स्थगित

Subscribe

मुंबई महापालिका निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ‘हयातीचे दाखले’ दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. याचपार्श्वभूमीवर आता माजी महापालिका कर्मचाऱ्यांनी हयातीचे दाखले 6 मेपर्यंत सादर न केल्यास निवृत्ती वेतन स्थगित करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्‍यात आले आहे.

मुंबई : मुंबई महापालिका निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ‘हयातीचे दाखले’ दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. याचपार्श्वभूमीवर आता माजी महापालिका कर्मचाऱ्यांनी हयातीचे दाखले 6 मेपर्यंत सादर न केल्यास निवृत्ती वेतन स्थगित करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्‍यात आले आहे. (Pension suspended if ex-municipal employees do not submit life certificates by May 6)

1 नोव्‍हेंबर 2023 ते 5 मार्च 2024 या कालावधीत हयातीचे दाखले सादर न करणाऱ्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी 6 मे 2024 पर्यंत हयातीचे दाखले मुंबई महापालिका मुख्यालयातील लेखा अधिकारी (निवृत्ती वेतन-आय.बी.) विभाग येथे ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत अथवा, केंद्र शासनाच्‍या ‘जीवनप्रमाण’ (www.jeevanpramaan.gov.in) या संकेतस्‍थळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. मात्र 6 मे 2024 पर्यंत हयातीचे दाखले ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने प्राप्‍त न झाल्‍यास मे, 2024 पासूनचे निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन तात्पुरत्‍या स्‍वरूपात स्थगित करण्यात येईल, याची संबंधीतांनी कृपया नोंद घ्यावी, असे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्‍यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai News: जागतिक वृक्षनगरी बहुमान पटकावण्यात मुंबई महानगराची हॅट्रीक

- Advertisement -

मुंबई महापालिका प्रशासनाने निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्‍त वेतनधारकांच्‍या हयातीच्‍या दाखल्‍यांबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्‍या आहेत. त्‍यानुसार, निवृत्ती वेतनधारकांनी पूर्णतः भरलेले हयातीचे दाखले ऑफलाइन पद्धतीने प्रमुख लेखापाल (कोषागार) कार्यालय, लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन-आय.बी.) विस्‍तारित इमारत, पहिला मजला, मुंबई महापालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – 400001 या पत्यावर सादर करावेत अथवा, केंद्र शासनाच्‍या
‘जीवनप्रमाण’ (www.jeevanpramaan.gov.in) या संकेतस्‍थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

हेही वाचा – Mushtaq Antule : विकासकामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; मुश्ताक अंतुलेंकडून स्पष्टीकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -