Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthNose Congestion-पावसाळ्यात वारंवार सर्दी होतेय, नाकं चोंदलय , मग करा हे उपाय

Nose Congestion-पावसाळ्यात वारंवार सर्दी होतेय, नाकं चोंदलय , मग करा हे उपाय

Subscribe

पावसाळ्यात एलर्जी, इन्फेक्शनबरोबरच डेंग्यू मलेरिया आणि सर्दी, ताप खोकल्याबरोबरच नाक चोंदण्याचा अनेकांना त्रास होतो. विशेष करुन रात्री झोपल्यावर नाक जाम होतं. त्यामुळे श्वास घेण्यासही काहींना त्रास होतो. यावर वेगवेगळी औषधं घेतली जातात. पण घरातील काही पदार्थांचा वापर करुनही नाक चोंदण्याच्या समस्येपासून सुटका करुन घेता येते.

- Advertisement -

वाफ घेणे

सर्दी किंवा खोकला झाल्यास, नाक जाम झाल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यामुळे, फुफ्फुसात श्वसननलिकेत जमलेला बलगम (श्लेष्मा), कफ गरम वाफेमुळे सैल होऊन सर्दीवाटे नाकातून बाहेर पडतो. त्यामुळे रुग्णास आराम मिळतो. दिवसातून २-३ वेळा गरम पाण्याची वाफ घेतल्यास नाक लवकर मोकळे होते.

- Advertisement -

खाऱ्या पाण्याने नाक साफ करणे
आपण खोकला झाल्यावर मीठाच्या पाण्याने गुळण्या करतो. पण बंद नाक मोकळं करण्यासाठी मीठाचे पाणी नाकातून टाकून नाक स्वच्छ केले जाते.त्यासाठी एका कपात कोमट पाणी घेऊन त्यात एक छोटा चमचा मीठ टाकावे. त्यानंतर मेडीकल मध्ये मिळणाऱ्या नोज पॉटच्या मदतीने ते पाणी एका नाकपुडीत हळूहळू सोडावे ते दुसऱ्या नाकपुडीतून आपोआप बाहेर येते. पण ही प्रक्रिया सावधपणे करावी. शक्य झाल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी.

 

भरपूर पाणी प्यावे

पाण्यामुळे छातीत साठलेला बलगम, कफ पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी ,खोकला, नाक जाम झाल्यावर भरपूर पाणी आणि द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करावे. यात साधे-कोमट-गरम पाणी, हर्बल टी, गरम सूप आवर्जुन घ्यावे.

आल्याचा चहा

आल्यामध्ये नैसर्गिक अँटी इंफ्लामेट्री गुण आहेत. त्यामुळे पाण्यात आल्याचा ठेचलेला तुकडा उकळून तो चहा घ्यावा. त्यात मध टाकून पिल्यास सर्दी, खोकलापासून लवकर आराम मिळतो.

कपाळ शेकावे

सर्दी खोकला झाल्यावर गरम पाण्याने कपाळ, चेहरा शेकावा. त्यासाठी गरम पाण्यात रुमाल भिजवून तो पिळून घ्यावा. त्यानंतर डोक्यावर आणि नाकावर त्याने शेकावे. सर्दीमुळे बऱ्याचवेळा नाकावर गालावर सूज येते. गरम शेक घेतल्यास सूज कमी होते.

- Advertisment -

Manini