घरलाईफस्टाईलसोशल मीडियात फॉलोअर्स वाढवणे पडू शकते भारी

सोशल मीडियात फॉलोअर्स वाढवणे पडू शकते भारी

Subscribe

सोशल मीडिया हे असे जग आहे जेथे काही लोक आता प्रसिद्ध होण्यासाठी येतात. येथे स्पर्धा असते ती म्हणजे नाव कमावण्याची आणि फॉलोअर्स वाढवण्याची. ज्याचे अधिक फॉलोअर्स असतील त्याला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळेच सध्या बहुतांश लोक फॉलोअर्स वाढवण्यासाठी नवेनवे मार्ग शोधून काढतात. येथे पैसे कमावण्याचे काही मार्ग ही मिळतात. लोकांना प्रसिद्ध होण्यासह नाव तर कमवायचे असते. मात्र अशातच काही लोकांची फसवणूक सुद्धा होते. (Followers on social media)

थर्ड पार्टी अॅप
हे अॅप सोशल मीडियात फॉलोअर्स वाढवणे, पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्स करण्यास मदत करतात. प्ले स्टोरवर असे काही अॅप आहेत. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला सोशल मीडिया अकाउंटसोबत लॉग इन करावेलागते. म्हणजेच तुम्ही थेट तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचा आयडी, ई-मेल आयडी आणि पासवर्ड अज्ञात अॅप सोबत लिंक करता. यामुळे अकाउंट हॅक होऊ शकते. या व्यतिरिक्त काही असे अकाउंट्स असतात जे फॉलोअर्स, लाइक्स आणि कमेंट्स वाढवण्याचा दावा करतात. मात्र त्या बदल्यात तुम्हाला पैसे द्यावे लागतात.

- Advertisement -

फॉलोअर्स वाढवण्यासाठी या दोन्ही पद्धती काम करतात. मात्र याच्या मदतीने जे अकाउंट्स तुम्हाला फॉलो करतात ते असे अकाउंट्स असतात जे सक्रिय नसतात किंवा स्पॅम असतात. यांचा कॉन्टेट शून्य असतो किंवा आपत्तीजनक असतो. ते केवळ एकमेकांना फॉलोअर्स करण्यासाठी असतात. अशा पद्धतीने तुमच्या फॉलोअर्सची संख्या तर वाढेल. मात्र तुमच्या अकाउंटची ग्रोथ होणार नाही.

- Advertisement -

गुंतवणूक स्कॅम
सोशल मीडियात तुम्ही अशी सुद्धा जाहिरात पाहिली असेल की, ज्यामध्ये व्यक्ती बिटकॉइनच्या कंपनीचे नाव घेत त्यात 50 हजार रुपयांची गुंतवणूक करताना दाखवतो. मात्र त्याला त्यामधून 1 लाख रुपये मिळतात. पोस्टमध्ये त्या कंपनी आणि व्यक्तीला सुद्धा टॅग केले जाते. तर तुम्हाला सद्धा माझ्यासारखे तुमचे आयुष्य बदलायचे असेल तर त्या व्यक्तीला टॅग करून मेसेज करा. खात्यात पैसे आल्यानंतर मेसेजचे स्क्रिनशॉट सुद्धा शेअर केले जातात. हा एक असा स्कॅम आहे ज्यामध्ये व्यक्तीचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करुन अशा प्रकारचे पोस्ट टाकले जातात.

क्रिप्टोकरंसी, बिटकॉइन सारख्या डिजिटल गुंतवणूकीचा ऑप्शन दिला जातो. फसवणूक करणारा व्यक्ती मेसेज करतो किंवा तुमच्या मित्रपरिवारापैकी एकाचे अकाउंट हॅक करुन तुम्हाला गुंतवणूक करण्यास तयार करतो. तो अशी एक लिंक देतो ज्याचे सर्व कंट्रोल त्या सायबर हल्लेखोराकडे असते. अशातच तो गुंतणूकीसंदर्भातील काही खोटे पोस्ट टाकण्यास सुरुवात करतो. काही प्रकरणी फसवणूकदार गुंतवणूकीच्या नावावर पैसे घेऊन गायब होतात.

पुढील गोष्टी लक्षात ठेवा
-गुंतवणूकीसंदर्भातील कोणत्याही अज्ञात क्रमांकावरुन आलेले मेसेज ओपन करु नका, ते डिलिट करा.
-कोणत्याही थर्ड पार्टी अॅपचा वापर करू नका.
-जर एखाद्या मित्राकडून पैसे किंवा एखादी लिंकचा मेसेज आला तर त्याला लगेच फोन करुन सांगा.
-ऑनलाईन शॉपिंग केवळ विश्वसनीय कंपनीकडून करा.
-फॉलोअर्स वाढवणे किंवा पैसे कमावण्याच्या नादात तुमची खासगी माहिती देऊ नका.


हेही वाचा- ऑनलाईन डेटींग करण्याआधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -