Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRelationshipया चुकांमुळे नातेसबंध येतात संपुष्टात

या चुकांमुळे नातेसबंध येतात संपुष्टात

Subscribe

नातेसंबंध हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही जर तुम्ही खूप सोशल आहात. सतत माणसांमध्ये राहण्याकडे तुमचा कल असेल तर अशा व्यक्तींसाठी नातेसंबंध हे सर्वात श्रेष्ठ असतात.पण नाते सांभाळणे हे कधीच सोपे नसते. नातेसंबंध हाताळण्यासाठी खूप काळजी,सावधगिरी आणि समजूतदारपणा आवश्यक आहे आणि या सर्व गोष्टींमुळे नातेसंबंध ‘टीकून राहतात. पण हल्लीच्या आधुनिक जगात कोणतेच नाते फार काळ टिकत नाही. याचे नेमके कारण समजून घेऊ.

- Advertisement -

अपेक्षा
नातेसबंधात एकमेकांकडून अपेक्षा या असणारच. पण बऱ्याचवेळा या अपेक्षांबद्दल बोललचं जात नाही.समोरची व्यक्ती अशीच वागली पाहीजे . तिने आपली सतत विचारपूस करायला हवी.तिने आपल्यासाठी अमुक करावं तमुक करावं असं आपल्याला वाटतं राहतं पण त्याबद्दल त्या व्यक्तीला कधीही सांगत नाही. यामुळे न बोललेल्या या अपेक्षांमुळे माणसे मनातल्या मनात एकमेकांपासून दूर जाऊ लागतात.

Relationship Crisis Is there a distance in your relationship? so you know What will you do

- Advertisement -

नेहमी स्वत:ला बरोबर सिद्ध करणे.

नेहमी स्वत:ला योग्य सिद्ध करण्याची चूकही तुमचे नाते बिघडू शकते. त्यामुळे नात्यात भांडणे वाढू लागतात. जेव्हा नातेसंबंधात इगो येतो. आपलंच खरं करण्याचे प्रमाण वाढते तेव्हा साहजिकच माणसं मनातून उतरु लागतात.

दुर्लक्ष करणे-
एकमेकांकडे दुर्लक्ष केल्याने तुमच्या नात्याचा पाया कमकुवत होऊ शकतो.जर तुमचा जोडीदार तुम्हाला काय हवं नको ते पाहतच नसेल किंवा तुम्ही जोडीदाराच्या गरजांना गांभीर्याने घेत नसाल तर हा नातेसंबंधासाठी रेड सिग्नल आहे. हे समजून जा.

“माझ्यासारखे व्हा”मानसिकता
तुम्ही ‘माझ्यासारखे व्हा’अशी मानसिकता जर जोडीदाराची असेल तर तेथे नाते टिकत नाही. असे नाते तुलना आणि टीकेला जन्म देते.यातून मग स्वतचे शहाणपण सिद्ध करण्यासाठी समोरच्याला तुच्छ लेखण्याचे प्रकार वाढतात. यातून मग मान अपमान नाट्य सुरू होते. ज्याचा शेवट नाते तुटण्यात होतो.

- Advertisment -

Manini