Thursday, May 16, 2024
घरमानिनीRelationship...असे हॅण्डल करा rejection

…असे हॅण्डल करा rejection

Subscribe

प्रेमात प्रत्येक वेळी होकार मिळेलच असे नाही अनेकांना नकारही मिळतो. आपण ज्याच्यावर प्रेम करतो किंवा ज्याला जीव लावतो त्याचा नकार पचविणे तसे अवघड काम आहे. नकार मिळाल्यानंतर खूप त्रास होतो. पण याचा अर्थ असा नाही की आता आपल्या आयुष्यात काहीच उरले नाही. खरं तर, नकार हा जीवनाचा एक भाग आहे. ज्यातून आपल्यापैकी बहुतेक जण कधी ना कधी तरी गेलेच असतील. नकार हा केवळ दोन व्यक्तीं एकत्र न येण्याचा मुद्दा नसून त्यामुळे तुमचे संपूर्ण भविष्यही उद्ध्वस्त होऊ शकते. कारण एखादी व्यक्ती सोडून गेल्यावर तो व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावतो. असे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्याने तुम्हाला नकार पचवायला मदत होईल.

Broken Heart Man Images – Browse 18,645 Stock Photos, Vectors, and Video | Adobe Stock

- Advertisement -

 

  • भावनेचा स्वीकार करा
    आपल्याला समोरून नकार आला तर तुमच्या मनात नकारात्मक विचारांचा पूर वाहू लागतो. या काळात, अशा गोष्टी स्वतःवर वर्चस्व गाजवू लागतात, ज्या स्वीकारणे कठीण असते. त्यामुळे समोरील व्यक्तीच्या भावनेचा स्वीकार करत समोरील परिस्थिती स्वीकारा.
  • एकाकीपणाचा वाईट परिणाम
    प्रेमात नकार मिळाल्यावर एकटे पडल्यासारखे वाटते. कोणाशीही बोलण्याची अथवा कोणाला भेटण्याची इच्छा होत नाही. कारण एकटेपणा तुम्हाला कमजोर बनवतो. अशा वेळी आपले मित्र आणि कुटुंबासह वेळ घालवा. तुमच्या भावना आणि अनुभव शेअर करणे कठीण असले तरी कुटूंबियांपासून दूर जाऊ नका.

352,312 Break Up Royalty-Free Images, Stock Photos & Pictures | Shutterstock

  • स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या
    नकाराचा तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीत, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अशा ऍक्टिव्हिटीमध्ये मध्ये स्वतःला गुंतवून ठेवा ज्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो हे समजून घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी कालांतराने स्वतःच चांगल्या होतात. मात्र यासाठी तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहावे लागेल.
  • कौन्सिलरशी बोला
    नकाराचे परिणाम खूप गंभीर असू शकतात, ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन विस्कळीत होऊ शकते. अशा परिस्थितीत, कौन्सिलरचा पाठिंबा कधीकधी खूप फायदेशीर ठरू शकतो. अशा प्रकारचे कौन्सिलिंग तुम्हाला यातून बाहेर पडायला मदत करते .

हेही वाचा ; कधीकधी ‘लेझी पॅरेंटिंग’सुद्धा ठरू शकते मुलांसाठी फायद्याचे

- Advertisment -

Manini