Tuesday, May 7, 2024
घरमानिनीRelationshipलहान मुलांना गोष्टी का सांगाव्यात

लहान मुलांना गोष्टी का सांगाव्यात

Subscribe

अनेक जणांनी लहानपणी गोष्टी ऐकल्याचं असतील. बिरबल, पांडव, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथांमधून आपण बरंच काही शिकलो आहोत.लहान मुलेच नव्हे तर मोठ्यांनाही या गोष्टींमधून जीवनाचे धडे मिळाले आहेत. मात्र, हल्ली काळ बदलला असल्याने अनेक लहान मुले आता गोष्टी ऐकण्याऐवजी स्मार्टफोन आणि टॅब्लेटला चिकटून असतात. पण संशोधनानुसार गॅझेट्सपेक्षा मुलांनी गोष्टी ऐकणं फायद्याचं ठरलं आहे. पाहुयात, मुलांना गोष्टी सांगण्याचे काही फायदे आहेत.

Parenting-tips-story-telling-to-children-benefits-info-in-marathi

भाषेवरील प्रभुत्व वाढेल –
केवळ पुस्तके वाचूनच नाही तर गोष्टी ऐकूनही शब्दसंग्रह वाढतो. तुमचं मूल लहान असेल तर तुम्ही त्याला एखादी गोष्ट सांगून बोलायला शिकवू शकता. अशाने मुलांचे भाषेवरील प्रभुत्व वाढण्यास मदत होईल.

भावनिक पैलू –
गोष्टी ऐकताना मुले स्वत:कडे गोष्टीतील पात्रे म्हणून पाहू लागतात. यामुळे त्यांना वेगवेगळ्या भावनांची जाणीव होण्यास मदत होते आणि ते इतरांच्या भावना देखील समजू लागतात . कथा ऐकणारी मुले चांगली माणसे बनू शकतात आणि भावनिक परिस्थितीही चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. म्हणजेच गोष्टी ऐकल्याने मुले भावनिकदृष्ट्या मजबूत होतात.

चांगले श्रोते बनतील –
आजकाल इतरांचे शब्द किंवा म्हणणे एकूण घेणारे लोक फार कमी आहेत. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की गोष्टी ऐकल्याने मुलांची ऐकण्याची क्षमता आणि इच्छा सुधारते. तसेच गोष्टी ऐकणारी मुले चांगली श्रोते बनतात.

How to tell bedtime stories your kids will love – My Night Light PTY LTD

- Advertisement -

कल्पनाशक्तीत वाढ होते –
गोष्टी ऐकल्याने मुलं गोष्टींची कल्पना करू लागतात. कथेतलं कोणतं पात्र आहे आणि कथा कशी चालली आहे, याचा विचार ते स्वत:च करू लागतात. या कल्पनाशक्तीमुळे मुलामध्ये विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमताही वाढते.

इतिहासाशी निगडित कथा ऐकून संस्कृतीची जाणीव होते –
इतिहासाशी निगडित कथा ऐकल्याने मुलांना संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते. आजी-आजोबांनी सांगितलेल्या कथांमधून मुलांना आधी कसे होते आणि तेव्हा सर्वजण कसे जगायचे, कसे काम करायचे, हे कळते. इतिहास वाचायला कंटाळवाणा वाटतो, पण गोष्टीतून सांगितल्यावर मुलांची आवड वाढते.

त्यामुळे तुमचं मूल हुशार व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर थोडा वेळ काढून त्याला एखादी गोष्ट सांगायला सुरुवात करा. याचा फायदा मुलालाच नाही तर तुम्हालाही होईल. आपल्या मुलासोबत काही खास आणि चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील नाते अधिक दृढ होण्यास मदत मिळेल.

 


हेही वाचा ; मुलांना बनवा स्वावलंबी

- Advertisment -

Manini