Tuesday, May 14, 2024
घरमानिनीRelationshipमुलांना बनवा स्वावलंबी

मुलांना बनवा स्वावलंबी

Subscribe

आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावणे ही सर्वस्वी पालकांची जबाबदारी आहे. लहानपणापासूनच लहान मुलांना योग्य शिक्षणासोबतच चांगले संस्कार देणे देखील गरजेचे असते. पण तुम्हाला माहित आहे का लहान -लहान गोष्टीसुद्धा मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजे हे जाणून घेऊयात.

Strong, loving relationship between parents and children is essential' | The Guardian Nigeria News - Nigeria and World News — Features — The Guardian Nigeria News – Nigeria and World News

स्वतःची कामे स्वतः करायला शिकविणे –
मुलांना स्वतःची कामे स्वतः करायला शिकविल्याने मुले स्वावलंबी बनतात. असे केल्याने ते कोणावर अवलंबून राहत नाहीत. ह्यात तुम्ही मुलांना शाळेचा डब्बा भरण्यापासून ते कपड्यांची घडी घालण्यापर्यंत कामांचा समावेश करू शकता.

स्वछता राखणे –
शरीराच्या स्वच्छतेसोबत घराची स्वछता कशी राखायची हे मुलांना शिकवा. तुम्ही यात घरच्या आजूबाजूचा परिसराचाही समावेश करू शकता अशाने ते जबाबदार नागरिक बनू शकतील.

मुलांची निसर्गासोबत नाळ जोडा-
मुलांची निसर्गासोबत नाळ जोडणे फार महत्वाचे आहे. असे केल्याने मुले जबाबदार बनतात तसेच त्यांना समाजाशी असलेल्या नात्याचे भान राहते. यासाठी तुम्ही मुलांना झाडांची काळजी घेण्यास शिकवा. मुलांना दररोज झाडांना पाणी घालण्याचे काम तुम्ही देऊ शकता.

Page 35 | Mom Son Gardening Design Images - Free Download on Freepik

- Advertisement -

आत्मविश्वास वाढवा –
मुलांना जबाबदार बनवायचे असेल तर सर्वात आधी मुलांचा आत्मविश्वास वाढवा.

छोटे- मोठे निर्णय घेऊ द्या –
मुलांना आयुष्याशी निगडित छोटे मोठे निर्णय घेण्यास भाग पाडा. याचा त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल.

स्वयंपाक शिकवा –
मुलांना स्वयंपाक घरातील काम करायला शिकवणे फायद्याचे ठरू शकते असे केल्याने भविष्यात त्यांना कठिण जाणार नाही. हल्ली अनेक मुले शिक्षणासाठी परगावी जातात . अशा वेळी त्याची ही सवय फायद्यची ठरेल. तसेच एकटे राहाण्याची वेळ आल्यावर त्यांना थोडे तरी स्वयंपाकघरातील काम येत असेल तर त्यांना अवघड जाणार नाही.

 


हेही वाचा ; पालकांच्या ‘या’ चुका मुलांना बनवतात ‘हट्टी’

- Advertisment -

Manini