मऊ लुसलुशीत पोळीसाठी कणिक मळताना वापरा ‘या’ टिप्स

मऊ लुसलुशीत पोळीसाठी कणिक मळताना वापरा ‘या’ टिप्स

फुलका किंवा चपाती ही प्रत्येकाच्या घरात बनवली जाते. त्यामुळे जेवणात भात, डाळ, भाजीसह चपातीही तितकीच महत्त्वाचा भाग आहे. मात्र फुलका किंवा चांगली चपाती बनवणे हे प्रत्येकालाच जमते असे नाही. काही जण चपाती करायला जातात पण काही वेळा चपाती गोलाकार आणि मऊ बनत नाही. अनेकदा चपात्या गोलाकार तर होतात पण मऊ होत नाही. पुष्कळदा पीठ अधिक पातळ किंवा घट्ट मळल्यामुळे चपाती गोलाकार तर होत नाही किंवा फुलतही नाही. त्यामुळे चपाती व्यवस्थित होण्यासाठी पीठ व्यवस्थित मळणे आवश्यक आहे. पीठ व्यवस्थित मळून घेतल्यावर प्रत्येक चपाती फुग्यासारखी फुलते. त्यामुळे पीठ मळण्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. खालील काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला पीठ मळताना खूप उपयोगी पडतील.

चांगले पीठ मळण्यासाठी टिप्स

१) पीठ मळण्यासाठी गोलाकार भांड घ्या

२) पीठ 1-2 मिनिटे चांगल्याप्रकारे गोलाकार परात वापरा, किंवा चपातीसाठी खूप वेळ पीठ मळून घेण्यासाठी सपाट पृष्ठभाग असलेल्या भांड्यांचा वापर करा,

पाण्याचे प्रमाण किती असावे

अनेकदा पीठ नको तितके घट्ट होते. तर अनेकदा जास्त पाणी वापरल्यामुळे चिक्ट आणि पातळ होते. या पिठाच्या चपात्या बनल्याने त्या तव्याला चिकटतात किंवा फुगत नाहीत. ही समस्या टाळण्यासाठी पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाण्याने मळलेल्या पिठाच्या चपात्या चांगल्या फुलतात आणि मऊ देखील राहतात. याचा आणखी एक फायदा असा की, यामुळे चपाती जास्त काळ मऊ राहते.

तेलाचे प्रमाण किती असावे?

जर तुम्ही मळलेले पीठ भांड्याला सतत चिकटत असेल तर खूप कोरडे पीठ वापरण्याऐवजी तेलाला वापर करावा. जास्त कोरडे पीठ वापरल्यामुळे चपाती लाटताना पीठ अतिशय कोरडे राहते, त्यामुळे प्लेन रोटी बनवता येत नाही,

किती वेळ पीठ मळावे

मुलायम आणि मऊ चपाती बनवण्यासाठी पीठ किमान 10 मिनिटे मळून घेणे गरजेचे आहे. यामुळे चपातीचा रंग आणि चव देखील चांगली येते, तसेच आपल्याला चपाती लाटण्यास कोणतीही अडचण येत नाही.

गोल आणि मऊ चपाती कशी लाटावी

 

१) गोल आणि मऊ चपाती बनविण्याची काही ट्रिक असते. त्याप्रमाणे तुम्ही वापर केल्यास, तुम्हाला कधीही त्रास होणार नाही.

२) पोळ्या अर्थात चपाती लाटायला घेताना पीठ पुन्हा एकदा नीट मळून घ्यावे.

३) चपाती लाटताना ती केवळ दोनच वेळा परता. जास्त वेळा परतवली तर ती फुगत नाही आणि त्याचा आकारही गोल येत नाही.

४) लाटल्यानंतर पोळी जास्त वेळ तशीच ठेवू नका, असं केल्यास, कधीही पोळी फुगणार नाही त्याशिवाय भाजून काढल्यानंतर ती कडक होते.

५) फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या सहसा करून नयेत.

(ही माहिती एक सामान्य माहिती प्रदान करते. यात कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. माय महानगर या माहितीची जबाबदारी घेत नाही.)


First Published on: June 19, 2023 7:10 PM
Exit mobile version